• Download App
    Indian Economy Stings at SCO Summit

    SCO शिखर संमेलनात भारतीय अर्थव्यवस्थेचा डंका!!; जगात सर्वाधिक 7.5% वेग!!

    वृत्तसंस्था

    समरकंद : भारतीय अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वाढत्या वेगाने पुढे चालली आहे. इतर देशांमध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर थोडा लडखडला असताना भारत मात्र 7.5% दराने आर्थिक वाढीची अशा धरू शकतो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. Indian Economy Stings at SCO Summit

    उजबेकिस्तानची राजधानी समरकंदमध्ये पंतप्रधान मोदी हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत. या संमेलनात अन्य राष्ट्राध्यक्षांंबरोबरच पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे भाषण झाले आहे. या भाषणात पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेचे बलस्थान अधोरेखित केले आहे. भारतात नवी स्टार्टअप अर्थव्यवस्था उभी राहताना भारत कोणत्या प्रकारच्या अभिनव संकल्पना राबवत आहे त्याचे सविस्तर वर्णन मोदींनी आपल्या भाषणात केले आहे.

     

     

     

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

    • भारताला आम्ही जागतिक पातळीवरची उत्पादन केंद्री अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारताची अर्थव्यवस्था 7.5% दराने वाढण्याची आम्हाला आशा आहे, जी सध्याच्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत कितीतरी वेगवान आहे. भारताचे विकासाचे मॉडेल लोककेंद्रीत आहे. जन सहभाग हा अर्थव्यवस्था वाढीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक भारताने मानला आहे.
    • भारतात आम्ही नवी कार्य संस्कृती विकसित करत आहोत. नवी अर्थरचना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतात आज 70 हजाराहून अधिक स्टार्टअप आहेत. त्यातले 100 पेक्षा अधिक युनिकॉर्न म्हणजे एकमेवाद्वितीय आहेत.
    • भारतात आम्ही स्टार्टअप साठी एक इनोवेशन वर्किंग ग्रुप स्थापन करून त्याचा अभ्यास आणि अनुभव SCO सदस्य देशांना शेअर करण्याची आमचा मनसूबा आहे. यातून जागतिक पातळीवर आपल्या संघटनेतील तब्बल 40% असलेल्या लोकसंख्येला लाभ होईल.
    • SCO संघटनेचे सदस्य देश जगाच्या अर्थव्यवस्थेत 30 % योगदान देतात. या देशांमध्ये जगाची 40% लोकसंख्या राहते. SCO सदस्य देश आपापसात सहकार्य करून राहिले, तर जगाचा विश्वास आपण संपादन करू शकू आणि जागतिक पातळीवर आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात आपले भर योगदान अधिक भरीव करू शकू. भारत यासाठी आपला मौलिक वाटा उचलण्यास तयार आहे.

    Indian Economy Stings at SCO Summit

     

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका