• Download App
    ओमायक्रोनच्या विषाची परीक्षा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा चंग । Indian cricket team to South Africa to test for omecron poisoning

    ओमायक्रोनच्या विषाची परीक्षा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा चंग

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ओमायक्रोन या घातक विषाणूच्या विषाची परीक्षा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा चंग भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बांधल्याचे वृत्त आहे. Indian cricket team to South Africa to test for omecron poisoning

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईत झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच दौरा होईल, असे बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी स्पष्ट केले.



    भारतीय संघ ३ डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळल्यानंतर ८ किंवा ९ डिसेंबर रोजी जोहान्सबर्गकडे चार्टर्ड विमानाने रवाना होईल.  द. आफ्रिकेत सुरक्षित बायोबबलमध्ये खेळाडूंचे वास्तव्य असेल,अशी ग्वाही देखील धुमल यांनी दिली. भारत-द. आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून रंगणार आहे.

    वृत्तसंस्थेशी बोलताना धुमल म्हणाले,‘ क्रिकेट दक्षिण आफ्रिका धोकादायक विषाणूविरुद्ध लढा देत असताना आम्ही त्यांच्यासोबत  आहोत. दुसरीकडे खेळाडूंच्या सुरक्षेशी देखील समझोता होणार नाही. सध्या वेळापत्रकानुसारच चार्टर्ड विमानाने संघ पाठविणार आहोत. खेळाडू तेथे बायोबबलमध्ये वास्तव्य करतील.

    Indian cricket team to South Africa to test for omecron poisoning

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक