Anti-Dowry Policy : हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी एका कंपनीने एक अनोखी सुरुवात केली आहे. शारजाह स्थित एरिस ग्रुप अँड कंपनीने आपल्या कर्मचार्यांवर हुंडाविरोधी धोरण लागू केले आहे. म्हणजेच जर या कंपनीत काम करणारे कर्मचारी हुंड्याची मागणी करत असतील तर त्यांना त्यांच्या नोकर्या गमवाव्या लागतील आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. कंपनी अनेक देशांमध्ये व्यवसाय करीत आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन रॉय यांनी जगात पहिल्यांदाच हुंडाविरोधी धोरणाला एखाद्या संस्थेच्या रोजगार कराराचा भाग बनवले आहेत. एक भारतीय कंपनी म्हणून हे अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे. Indian CEO Of UAE-Based Firm Introduces Strict Anti-Dowry Policy For Employees
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी एका कंपनीने एक अनोखी सुरुवात केली आहे. शारजाह स्थित एरिस ग्रुप अँड कंपनीने आपल्या कर्मचार्यांवर हुंडाविरोधी धोरण लागू केले आहे. म्हणजेच जर या कंपनीत काम करणारे कर्मचारी हुंड्याची मागणी करत असतील तर त्यांना त्यांच्या नोकर्या गमवाव्या लागतील आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. कंपनी अनेक देशांमध्ये व्यवसाय करीत आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन रॉय यांनी जगात पहिल्यांदाच हुंडाविरोधी धोरणाला एखाद्या संस्थेच्या रोजगार कराराचा भाग बनवले आहेत. एक भारतीय कंपनी म्हणून हे अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यावर्षी 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त कंपनीने वेश्यावृत्तिविरोधी कायद्याचा प्रस्ताव दिला होता. या आठवड्यात कंपनीने याची अंमलबजावणी केली आहे. हे धोरण 16 देशांमधील कंपनीच्या शाखांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांसह सर्व कर्मचार्यांवर काटेकोरपणे लागू केले आहे. नवीन नियमांनुसार, भविष्यात हुंडा घेणाऱ्या किंवा देणाऱ्या कोणत्याही कर्मचार्यास पुढे काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हुंडाविरोधी जागरूकता अभियान चालविण्याच्या सूचना
कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या कराराचे नूतनीकरण करण्यासाठी प्रथम हुंडाविरोधी धोरणावर सही करणे बंधनकारक केले आहे. यासह हुंडाविरोधी जागरूकता मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Indian CEO Of UAE-Based Firm Introduces Strict Anti-Dowry Policy For Employees
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना लिपलॉक पडले महागात, कोविड नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपानंतर राजीनामा
- India Corona Updates : दोन दिवसांनंतर पुन्हा 50 हजारांच्या पुढे कोरोना रुग्णंसख्या, रिकव्हरी रेट वाढून 96.75% वर
- RBIची आमदार, खासदारांना नागरी बँकांचे संचालक होण्यास बंदी; शरद पवार काय म्हणाले, जाणून घ्या!
- जम्मूत एयरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल एरियात 5 मिनिटांत 2 स्फोट, ड्रोनच्या वापराचा संशय; हवाई दलाचे 2 जवान जखमी
- किल्ले रायगड, माथेरानचे दरवाजे तब्बल तीन महिन्यांनी पर्यटकांना खुले ; ई -पासचे बंधन