उरी आणि हातलंगा येथे काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराचे ऑपरेशन सुरूच आहे. खोऱ्यातील अनेक भागात लष्कराकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान काश्मीरमधील बारामुल्लामध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. आज बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. Indian Army kills three terrorists in Baramulla Action continues in Anantnag too
बारामुल्ला जिल्ह्यातील उरी आणि हातलंगा येथे काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. लष्कराने एकापाठोपाठ एक तीन दहशतवाद्यांना ठार केले. लष्कर आणि जम्मू पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
या कारवाईबाबत भारतीय लष्कराने सांगितले की, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत आज बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. तीन दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता पण आमच्या जवानांनी तो हाणून पाडला. यात दोन दहशतवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तिसरा दहशतवादीही मारला गेला, मात्र नियंत्रण रेषेवर पाकच्या चौक्यांद्वारे केलेल्या गोळीबारामुळे मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
Indian Army kills three terrorists in Baramulla Action continues in Anantnag too
महत्वाच्या बातम्या
- वाराणसीमध्ये रामदेव बाबांची सनातनद्वेष्ट्यांवर जोरदार टीका; २०२४चा उल्लेख करत म्हणाले…
- मराठवाड्याचे शोषण थांबवून तहान भागविणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला संजीवनी!!
- अँकर्स वरच्या बहिष्काराची भाषा काँग्रेसने बदलली, सविनय आंदोलनाची केली; पण प्रत्यक्षात बंदीची “मात्रा” चालवलीच!!
- UAE ने PoKला भारताचा भाग म्हणून दाखवले; भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा नकाशा जारी; 370 हा भारताचा मुद्दा असल्याचे सांगितले