वृत्तसंस्था
श्रीनगर : मेक इन इंडियामधील Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles ने घुसखोरांवर प्रहार; वाहनांचे रंग बदलून काश्मिरींना मैत्रीचा हात, असे दुहेरी धोरण भारतीय लष्कराने आखले आहे.Indian Army has changed the colour of flags on its military convoy vehicles to blue from red
एकीकडे सीमेवर भारतीय लष्कराची प्रहारक्षमता अचूक आणि परिणामकारक करण्यासाठी जवांनांच्या हातात Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles देताना भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये आपल्या वाहनांचा रंग बदलला आहे.
भारतीय लष्करी वाहनांच्या ताफ्यातील ध्वज आणि वाहनांचे रंग काश्मीर खोऱ्यातील जनतेशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लाल रंगाकडून निळ्या रंगामध्ये बदल करण्यात आला आहे. वाहनांवर प्लेक्स लावून मैत्री आणि शांती संदेशही देण्यात येत आहेत. काश्मिरी जनतेपुढे भारतीय लष्कराने मैत्रीचा हात केला आहे.
रमजानचा पवित्र महिना सुरू झाल्याने त्याचे संदेशही लष्करी वाहनांवर लावण्यात आले आहेत. काश्मिरी सण – समारंभ यांचे प्रतिबिंब भारतीय लष्कराच्या व्यवहारात आले पाहिजे, याची दक्षता घेण्यात येत आहे.