विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला त्यांनी भारताशी चर्चा करायची विनंती केली. ती विनंती भारताने मान्य केली. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दोन्ही बाजूंचे फायरिंग थांबविण्याविषयी एकमत झाले. त्यानुसार सध्या भारताने फायरिंग थांबविले आहे, एवढाच खुलासा भारतीय सैन्य दलांनी आज पत्रकार परिषदेत केला. भारतीय सैन्य दलाच्या प्रतिनिधींनी शस्त्रसंधी अर्थात ceasefire हा शब्द वापरला नाही. Indian Army
कमोडर रघु नायर यांच्या नेतृत्वाखाली विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत योमिका सिंह आणि कर्नल कुरेशी यांनी “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीचा पाढा वाचला. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानने खोटा प्रपोगंडा चालविल्याचा पर्दाफाश केला. त्या उलट पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर दरम्यान लष्करी आणि हवाई दलाचे प्रचंड नुकसान सोसावे लागले याची पुराव्यांसह माहिती दिली.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा, सियालकोट, जकोबाबाद, स्कर्डू आणि भुलारी या हवाई तळांचे कधीही भरून न येणारे प्रचंड नुकसान केले. भारताने पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले. पाकिस्तानी भारतावर मशिदी टार्गेट केल्याचा आरोप केला, जो पूर्णपणे खोटा आहे. कारण भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि भारतीय सैन्य दले त्याचे उत्तम उदाहरण आहे.
त्यानंतरच पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांनी भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना आज दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी फोन केला. चर्चेची विनंती केली. ती भारताने मान्य केली. सायंकाळी 5.00 वाजता दोन्ही बाजूंनी फायरिंग थांबाविले. पण भारताचा दहशतवादाविरुद्धचा लढा कायम सुरू असून भारतीय सैन्य दले त्या लढाईत कायमच अग्रेसर राहतील, असे कमोडर रघु नायर यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण पत्रकार परिषदेत कुठल्याही वरिष्ठ सैन्यदल अधिकाऱ्याने शस्त्रसंधी अर्थात ceasefire हा शब्द वापरला नाही.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलेल्याट्विटमध्ये देखील फक्त फायरिंग थांबविण्याचाच उल्लेख राहिला. त्यांनी देखील ट्वीटमध्ये ceasefire हा शब्द वापरला नाही.
Indian Army clear statement; No word of ceasefire used
महत्वाच्या बातम्या
- Colonel Sophia कर्नल सोफिया म्हणाल्या- पाकिस्तान नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतोय; 400 ड्रोन उडवले
- BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय
- Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!