• Download App
    भारतीय - अमेरिकी नागरिकांचे संबंध दोन देशातल्या संबंधांचे अस्सल इंजिन, याच इंजिनाची गर्जना व्हाईट हाऊस बाहेर ऐकली; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन Indian-American relations are the real engine of relations between the two countries

    भारतीय – अमेरिकी नागरिकांचे संबंध दोन देशातल्या संबंधांचे अस्सल इंजिन, याच इंजिनाची गर्जना व्हाईट हाऊस बाहेर ऐकली; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अमेरिका दौऱ्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिसमध्ये भेट घेतली. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी यावेळी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत – अमेरिका संबंधांचे महत्त्व अधोरेखित करताना विशेष उद्गार काढले. Indian-American relations are the real engine of relations between the two countries

    पंतप्रधान मोदी म्हणाले, की ज्यावेळी दोन देशांमधील संबंधांचा विषय येतो, त्यावेळी औपचारिक द्विपक्षीय चर्चा आणि द्विपक्षीय संयुक्त पत्रक असे विषय पुढे येतात. त्या विषयाचे निश्चित विशिष्ट महत्त्व आहे. पण भारत आणि अमेरिका यांचे संबंध अशा औपचारिकतेच्या पलीकडे महत्त्वाचे आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे अस्सल इंजिन दोन देशांमधील जनतेचे आपापसातले संबंध हे आहे आणि त्या इंजिनाची गर्जना आपण आत्ताच वाईट हाऊसच्या समोर लॉनवर ऐकली!!

     

    आज अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत भारत आणि अमेरिका या दोन सर्वात मोठ्या लोकशाहीनिष्ठ देशांकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. आपल्या दोन्ही देशांची राजनैतिक भागीदारी मानव जातीचे कल्याण, जागतिक शांतता, स्थिरता आणि लोकशाही मूल्यांवरचा विश्वास दृढ करणारी आहे. इतकेच नाही, तर जगात लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व देशांना विशिष्ट ताकद देणारी आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

    आठ वर्षांपूर्वी जो बायडेन अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी भारत अमेरिका बिजनेस कौन्सिलची संकल्पना मांडली होती. आज ती प्रत्यक्षात येताना सर्व भारतीय आणि अमेरिकन नागरिकांना आनंद होतो आहे, असे उद्गारही पंतप्रधान मोदींनी काढले.

    त्याच वेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिका आणि भारत अंतरिक्ष, समुद्री विज्ञान तंत्रज्ञान, हरित तंत्रज्ञान यांच्यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहयोग करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. गेल्या 10 वर्षांत दोन्ही देशांनी छोटी पण मजबूत पावले टाकून दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक दृढमूल केले याकडेही बायडे यांनी लक्ष वेधले.

     

    Indian-American relations are the real engine of relations between the two countries

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात