वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पॅलेस्टाईनमधील भारताचे राजदूत मुकुल आर्य यांचे निधन झाले आहे. मुकुल आर्य दूतावासात मृतावस्थेत आढळले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुकुल आर्य यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पॅलेस्टाईनने या प्रकरणी भारताला सर्व प्रकारची मदत देण्याचे सांगितले आहे. Indian Ambassador to Palestine Mukul Arya dies; The body was found at the embassy
मुकुल आर्य हे रामल्ला येथील दूतावासात मृतावस्थेत आढळले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, पॅलेस्टाईनमधील रामल्ला येथील भारताचे राजदूत मुकुल आर्य रविवारी दूतावासात मृतावस्थेत आढळले. मुकुल आर्य यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. एस जयशंकर यांनी मुकुल आर्य यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुकुल आर्य यांचे एक प्रतिभावान अधिकारी म्हणून वर्णन केले आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी मुकुल आर्य यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांप्रती शोक व्यक्त केला आहे. २००८ च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आर्य यांचा मृत्यू कसा झाला हे लगेच कळू शकले नाही. पॅलेस्टिनी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की त्यांना राजदूत आर्य यांच्या मृत्यूची बातमी “मोठे आश्चर्य आणि धक्कादायक” आहे.