• Download App
    भारतीय हवाई दल अत्याधुनिक C - 295 विमाने खरेदी करणार; टाटा ग्रुपचा सहभाग; "मेक इन इंडिया"साठी मोठे प्रोत्साहन|Indian Air Force to procure state-of-the-art C-295 aircraft; Participation of Tata Group; Big incentive for "Make in India"

    भारतीय हवाई दल अत्याधुनिक C – 295 विमाने खरेदी करणार; टाटा ग्रुपचा सहभाग; “मेक इन इंडिया”साठी मोठे प्रोत्साहन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालय आणि स्पेनची कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्यात एक करार झाला असून C – 295 बनावटीची 56 विमाने भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्याचे निश्चित झाले आहे. या महत्त्वपूर्ण करारात टाटा ऍडव्हान्स सिस्टीम्स यांचाही सहभाग असून भारताच्या “मेक इन इंडिया” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला यामुळे चालना मिळणार आहे.Indian Air Force to procure state-of-the-art C-295 aircraft; Participation of Tata Group; Big incentive for “Make in India”

    भारतीय हवाई दलात C – 295 बनावटीची 56 विमाने दाखल करून त्यामध्ये बहुउपयोगी व्यवस्था तयार करण्याचे काम टाटा ग्रुप करणार आहे. ही लढाऊ विमाने इंधन भरणीपासून ते प्रत्यक्ष लढाईत उतरण्यापर्यंतची कामे करू शकणार आहेत.



    संरक्षण उत्पादन क्षेत्रात यानिमित्ताने स्वदेशी कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध होईल_ असे टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे. भारतामध्ये लढाऊ विमानांच्या उत्पादनाला यातून चालना मिळेल. भारत लवकरच विमान उत्पादन क्षेत्रातही आत्मनिर्भर त्याच्या दिशेनी मोठी पावले टाकेल. आंतरराष्ट्रीय मानके भारत निश्चित करेल, असा विश्वास आजच्या कराराच्या निमित्ताने वाटतो, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.

    भारतीय हवाई दलाची नवीन आव्हानांच्या दृष्टीने निर्माण झालेली गरज C – 295 ही विमाने पूर्ण करतीलच परंतु त्यापेक्षाही आधुनिक सिस्टीम असलेली विमाने आपण भारतातच तयार करू शकू. तेवढी सामग्री आणि कौशल्य भारतीय वैज्ञानिक आणि इंजिनियर्सकडे नक्की आहे, असेही रतन टाटा यांनी आपल्या अभिनंदन पत्रात नमूद केले आहे.

    Indian Air Force to procure state-of-the-art C-295 aircraft; Participation of Tata Group; Big incentive for “Make in India”

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य