Indian Air Force : देशात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने मेडिकल ऑक्सिजन व अनेक औषधांचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवत आहे. सरकारला या संकटाच्या काळात आता हवाई दलाने साथ दिली आहे. ऑक्सिजन कंटेनर, सिलिंडर, आवश्यक औषधे, उपकरणांना एअरलिफ्ट करून आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. Indian Air Force Helps in Corona crisis, supplies oxygen-drugs across the country by airlift
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने मेडिकल ऑक्सिजन व अनेक औषधांचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवत आहे. सरकारला या संकटाच्या काळात आता हवाई दलाने साथ दिली आहे. ऑक्सिजन कंटेनर, सिलिंडर, आवश्यक औषधे, उपकरणांना एअरलिफ्ट करून आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे.
हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयएएफने कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बंगळुरू येथील आरोग्य कर्मचार्यांना डीआरडीओच्या दिल्लीतील कोविड-19 रुग्णालयात विमानातून आणले. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, एअरफोर्सने डीआरडीओचे ऑक्सिजन कंटेनरही बंगळुरूहून दिल्लीतील कोविड केंद्रांवर नेले आहेत.
भारतीय वायुसेनेने ट्विटरवर लिहिले आहे की, ‘आयएएफचा ताफा कोरोनाविरुद्ध लढत आहे. वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक उपकरणे आणि औषधे देशभरातील कोविड रुग्णालयात पोहोचवली जात आहेत.’
डीआरडीओकडूनही पुरेपूर मदत
डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सांगितले की, आतापर्यंत दिल्लीत 250 बेड क्षमता असलेली कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याची क्षमता 500 बेडवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय पाटण्यातील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये 500 बेडची व्यवस्था झाली आहेत. लखनऊमध्ये 450 बेड व वाराणसीमध्ये 750 बेडची क्षमता असलेल्या केंद्रांची उभारणी सुरू आहे. यासह डीआरडीओकडून अहमदाबादमध्येही 900 बेडचे कोविड रुग्णालय बनवण्याचे काम सुरू आहे.
Indian Air Force Helps in Corona crisis, supplies oxygen-drugs across the country by airlift
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री एके वालिया यांचे कोरोनामुळे निधन, अपोलो रुग्णालयात सुरू होते उपचार
- Corona Updates In India : कोरोनाच्या बाबतीत जगभरातील रेकॉर्ड मोडले, एका दिवसात भारतात 3.15 लाख नवे रुग्ण, अमेरिकेलाही टाकले मागे
- CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनामुळे निधन, गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- ‘बावीस गेले, अजून किती?’ नाशिक दुर्घटनेवर डॉ. अमोल अन्नदातेंची अंतर्मुख करायला लावणारी कविता
- Maharashtra Lockdown Rules : राज्यात आज रात्री ८ वाजेपासून कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद… वाचा संपूर्ण नियम!