वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्र सरकार एकीकडे कोरोना फैलावाच्या प्रतिबंधासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत असताना इंधन दरवाढीवर तसेच पर्यायी इंधनावर देखील लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात कमी किमतीत इलेक्ट्रीक वाहन चार्जर उपलब्ध करवून देण्याचा सरकारचा मनसूबा आहे. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. India will soon benefit from innovative low-cost Electric Vehicle (EV) charge point that can accelerate adoption of EVs.
देशाची पेट्रोलसारख्या महागड्या इंधनाची आयात कमी व्हावी यासाठी इलेक्ट्रीक वाहन निर्मितीला केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याच बरोबर इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन वाढून ही वाहने रस्त्यावर आली तर त्यांच्या चार्जिंगचा नियमित प्रश्न तयार होणार आहे, हे लक्षात घेऊन स्वस्तातले चार्जिंग पॉइंट्स तयार करण्याच्या दृष्टीने उत्पादकांना सरकार प्रोत्साहन योजना आणत आहे.
छोट्या चार्जिंग पॉइंट्सच्या किमती ३५०० रूपयांपासून सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या आकार, टिकावूपणा यावर देखील विविध उत्पादकांचे प्रयोग सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये काही कंपन्यांची सँम्पल प्रॉडक्टही परीक्षणासाठी आणि प्रायोगिक वापरासाठी तयार असतील, अशी माहिती वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने दिली आहे.
इ – स्कूटर्स आणि इ – ऑटोरिक्षांना हे चार्जिंग पॉइंट्स आपल्याबरोबरच वागविण्यात येण्याइतपत यूजर फ्रेंडली करण्याकडे कंपन्यांचा कल आहे. याच्या किमती परवडण्यासारख्या ठेवण्याचे प्रयत्न आहेत. तसेच त्यांची कपॅसिटी ३ किलोवॅट इलेक्ट्रीक चार्जिंगपर्यंतही ठेवण्याचे प्रयत्न आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.
India will soon benefit from innovative low-cost Electric Vehicle (EV) charge point that can accelerate adoption of EVs.
महत्त्वाच्या बातम्या
- देशात आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची याचिकेद्वारे मागणी, मद्रास हायकोर्टाने फेटाळली
- पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, संशयित हल्लेखोराला अटक
- रुची सोयाकडून बाबा रामदेव यांच्या बिस्किट कंपनीची खरेदी, 60.02 कोटी रुपयांचा व्यवहार
- भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने फेटाळली जामीन याचिका
- पंजाबमध्ये चाललंय काय? आधी रेमडेसिव्हिर नाल्यात फेकले, आता पीएम केअर्समधून मिळालेले व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून