• Download App
    भारत कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही, संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा चीनला इशारा India will not bow to any pressure, Chief of Defense Staff General Bipin Rawat warns China

    भारत कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही, संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा चीनला इशारा

    देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, अशा शब्दांत संरक्षण दलांचे प्रमुख जनर बिपीन रावत यांनी चीनला इशारा दिला आहे. India will not bow to any pressure, Chief of Defense Staff General Bipin Rawat warns China


    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, अशा शब्दांत संरक्षण दलांचे प्रमुख जनर बिपीन रावत यांनी चीनला इशारा दिला आहे.

    रायसिन चर्चासत्रामध्ये बोलताना रावत म्हणाले की, चीनकडे वरच्या दर्जाची सशस्त्र दल आहे त्यामुळे आपण अनेक देशांना झुकवू शकतो असा त्यांचा समज होता, परंतु भारताने खंबीर भूमिका घेत देश कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही हे सिद्ध केले.



     

    भारताने खंबीर भूमिका घेतली आणि त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळाला, भारत दबावापुढे झुकेल असे त्यांना वाटले, मात्र तसे घडले नाही. लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि दोन्ही देशांनी फेब्रुवारी महिन्यात पांगॉँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील तीरांवरून आपले सैनिक आणि शस्त्रे मागे घेतली. आता संघषार्ची जी ठिकाणे राहिली आहेत तेथूनही सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.

    India will not bow to any pressure, Chief of Defense Staff General Bipin Rawat warns China

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत