• Download App
    १५ ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटकांसाठी विसा देण्यात येईल | India will grant tourist visas to foreigners traveling through Chartered flights from October 15

    १५ ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटकांसाठी विसा देण्यात येईल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : १५ ऑक्टोबर पासून चार्टर्ड विमानातून प्रवास करणाऱ्या विदेशी पर्यटकांना भारत सरकारकडून टुरिस्ट विसा देण्यात येईल. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

    India will grant tourist visas to foreigners traveling through Chartered flights from October 15

    गृहमंत्रालयाने त्यांच्या आदेशामध्ये असे सांगितले की, चार्टर्ड फ्लाइट्स व्यतिरिक्त इतर फ्लाईटनी येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी १५ नोव्हेंबर पासून विसा दिला जाईल. कोरोनामुळे सर्व विसा बंद करण्यात आले होते. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासावर इतर अनेक बंधने ही कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी घातली गेली होती. राज्य सरकारकडून तसेच पर्यटनक्षेत्राकडून टुरिस्ट विसा देण्याबद्दल मागणी होत होती.


    BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये वटवाघूळ, दिल्लीला परत आणून विमानाची इमर्जन्सी लँडिंग


    MHA नी इतर मंत्रालयांबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पर्यटन परराष्ट्र व्यवहार व नागरी वाहतूक मंत्रालय) आणि जिथे परदेशी प्रवासी येतात अश्या राज्यांच्या सरकारबरोबर चर्चा केली. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासातील काही नियमांमध्ये या निर्णयामुळे थोडी सवलत मिळाली आहे.

    India will grant tourist visas to foreigners traveling through Chartered flights from October 15

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले