विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : टीम इंडियाने न्यूझीलंडवर सांघिक कामगिराच्या जोरावर दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर एकतर्फी फरकाने मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांचं विक्रमी आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात वर्ल्ड कप जिंकला. तसेच भारताची ही टी 20i वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याची सलग दुसरी तर एकूण तिसरी वेळ ठरली. भारताने 2024 साली रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर मात करत 17 वर्षांनंतर पहिला टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. त्याआधी महेंद्रसिंह धोनी याने भारताला 2007 साली पहिल्याच झटक्यात ही ट्रॉफी जिंकून दिली होती.
टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय बॅटिंगच्या सुनामी मध्ये न्यूझीलंड वाहून गेले. संजू सॅमसन अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शुभम दुबे यांनी तुफानी फटकेबाजी करून नरेंद्र मोदी स्टेडियम डोक्यावर घेतले.
न्युझीलँडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला बोलाविले, याचा त्याला पाश्चाताप झाला कारण संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या 5 षटकांमध्येच पावर प्ले दाखवत न्यूझीलंडला झोडपून काढले. त्यांनी न्यूझीलंडच्या कुठल्याच गोलंदाजाला सोडले नाही. संजू सॅमसन यांनी 89 अभिषेक शर्माने 52 ईशान किशन ने 54 आणि शिवम दुबे याने शेवटच्या षटकांमध्ये 20 धावा काढून भारताचा 255 धावांचा डोंगर उभा केला.
– जेम्स निशामच्या 3 विकेट्स
जेम्स निशाम याने एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन थोडा थरार निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याने ईशान किशन हार्दिक पंड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांना बाद केले. पण तोपर्यंत संपूर्ण सामन्यावर भारताची पकड बसली होती. शेवटच्या चार षटकांमध्ये 19 धावा निघाल्या, पण शेवटच्या षटकामध्ये शिवम दुबे याने तुफान फटकेबाजी करून जेम्स निशामकडून 20 धावा वसूल केल्या. शुभम दुबे याने 26 धावा केल्या. त्याला तिलक वर्माने सहा धावा काढून साथ दिली. त्यामुळे भारताचा 255 धावांचा डोंगर झाला. न्यूझीलंड पुढे 256 धावांचे मोठे आव्हान उभे राहिले.
– अभिषेकने ठरविला विश्वास सार्थ
अंतिम सामन्याच्या आधी अभिषेक शर्माला संघातून वगळायचा दबाव वाढला होता, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेकला संघातून वगळले नाही. अभिषेकने सूर्यकुमार यादवचा विश्वास सार्थ ठरविला. त्याने 18 बॉल मध्ये 52 धावा ठोकल्या.
India vs Newzealand t20 world cup final
महत्वाच्या बातम्या
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या ठिकाणांवर ईडीचा छापा; सकाळ होण्यापूर्वीच १५ पथके पोहोचली
- Global Alert : इराण युद्धाच्या झळा, तुर्कीवर हल्ल्यानंतर नाटो देश सतर्क, पाकिस्तानवरही युद्धात उतरण्याचा दबाव
- विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा!!
- Inside Story : सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचले!!