वृत्तसंस्था
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी जपानच्या दौऱ्यामध्ये भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड संमेलनात सहभाग घेतलाच. पण त्याचबरोबर तीनही देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी चर्चा करताना “मेक इन इंडिया” – आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर अधिक भर दिला. संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांनी भारतामध्ये उद्योग वरून उत्पादन करावे अशी आग्रही भूमिका पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष बायडेन यांच्यासमोर मांडली. India-US Bilateral Talks Main Focus Defense Products – “Make in India
कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर चीन मधून विविध कंपन्या बाहेर पडत आहेत. कारण त्यांची उत्पादनक्षमता चीनमध्ये खूप कमी झाल्याने त्या तोट्यात गेल्या आहेत. अशावेळी भारताची भूमी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. आत्मनिर्भर भारताचा योजनेतून “मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड” या उपक्रमाद्वारे विविध कंपन्या भारतात येऊन आपले उत्पादनाचे प्लांट उभारू शकतात, याकडे पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष बायडेन यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर पंतप्रधानांनी अमेरिकन उद्योजकांना देखील “मेक इन इंडिया” ही संकल्पना विशद करून सांगितली.
भारत आणि अमेरिका यांच्यातील उद्योजक एकत्र येऊन संयुक्त प्रकल्प उभारू शकतात. यासाठी येथे मुबलक जमीन, उत्तम कौशल्य असलेले मनुष्यबळ उपलब्ध आहेत, अशी ग्वाही देखील यांनी दिली. संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताची क्षमता खूप मोठी आहे. या क्षमतेचा अमेरिकन उद्योजक देखील उत्तम वापर करू शकतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताचे परराष्ट्र सचिव विनायक क्वात्रा हे या चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनी मोदी – बायडेन द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
India-US Bilateral Talks Main Focus Defense Products – “Make in India
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल – डिझेल : शेजारच्या गुजरात मधून पेट्रोल आणतो; महिन्याला 3000 रुपये वाचतात!!
- पेट्रोल – डिझेल : महागाईला जबाबदार कोण? केंद्र की राज्य??; आकडेवारी काय सांगते??
- नवाब मलिक कनेक्शन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा
- बैठकीतील चर्चेवरून शरद पवारांकडून दिशाभूल; ब्राह्मण संघटना घेणार पत्रकार परिषद
- संभाजीनगरात प्रचंड जलआक्रोश : औरंग्याचा पोपट काय म्हणतो??, पाणी द्यायला नाही म्हणतो!!
- Modi In Japan : मख्खन पर लकीर खिचने में मजा नही आता, मैं पत्थर पर लकीर खिचता हूँ!!; मोदींच्या वक्तव्याचा अर्थ काय??