विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना बळींच्या संख्येत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात तब्बल ५ लाख बळी कोरोनामुळे गेले आहेत.जागतिक क्रमवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून सर्वाधिक ९.१ लाख बळी गेले आहेत.India third in corona victim;Five lakh civilians have died so far
दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. तेथे सुमारे ६.३ लाख जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. रशियात ३.३ लाख लोकांचा मृत्यू झाला असून तो जागतिक क्रमवारीत चौथ्या नंबरवर आहे. त्यानंतर मेक्सिकोचा नंबर लागत असून तेथे३.०७ लाख जण बळी गेले आहेत.
भारतात १ जुलै २०२० रोजी बळीच्या संख्येने ४ लाखांचा टप्पा ओलांडला होता. केवळ २१७ दिवसांत ही संख्या पाच लाखांवर पोचली आहे. परंतु एक लाख लोकांचा बळी जाण्यास बराच वेळ लागल्याचे आकडेवारी सांगत आहे. याचाच अर्थ मृत्यूचा वेग हा कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरण वेगाने झाल्याने मृत्यूचा दर कमी झाल्याचे या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
India third in corona victim;Five lakh civilians have died so far
महत्त्वाच्या बातम्या
- गांधीहत्येसाठी आरएसएसला जबाबदार धरणाऱ्या कॉँग्रेसने कधीही पुरावे दिले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणार का? इंद्रेश कुमार यांचा सवाल
- ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केली चीनची पोलखोल, गलवान संघर्षात ३८ चीनी सैनिक गेले होते वाहून
- चीनच्या उद्दामपणाला भारताकडून चोख प्रत्युत्तर, गलवानमधील कमांडरला मशाल दिल्याने राजदूत टाकणार ऑलिम्पिकवर बहिष्कार
- पंजाब मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक; जालंधरमध्ये ईडीची कारवाई