वृत्तसंस्था
ओटावा : कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारला जबाबदार धरल्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ट्रूडो सरकारला दणका देत कॅनडियन नागरिकांची व्हिसा सेवा रोखली आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर “असुरक्षित देश” असा ठपका ठेवल्यानंतर भारताने त्या देशाच्या नागरिकांचा नागरिकांची व्हिसा सेवा रोखून तिथल्या सरकारला दणका दिला आहे. India suspends visa services for Canadians amid heightened tensions
भारताने कॅनेडियन लोकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसाठी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत आणि कॅनडात तणाव वाढत आहे. हे लक्षात घेऊन कॅनडातील भारताच्या व्हिसा अर्ज केंद्राने ही घोषणा केली आहे.
याआधी मंगळवारी ट्रुडो सरकारने खोडसाळपणा करत आपल्या नागरिकांना भारताच्या काही भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी भारतानेही असाच सल्ला जारी केला. यानंतर कॅनडाने रात्री उशिरा भारताचा सल्ला फेटाळला. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेबनेक यांनी ओटावा येथे मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांचा देश पूर्णपणे सुरक्षित आहे.
भारताची अॅडव्हायझरीत
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायझरी जारी केली होती. कॅनडात सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया पाहता तेथे राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे त्यात नमूद केले होते.
अलीकडच्या काळात, भारतीय मुत्सद्दी आणि कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या विशिष्ट वर्गाला धमकावले जात असल्याचे दिसून आले आहे. भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणारे हेच लोक आहेत.
अॅडव्हायझरीनुसार, कॅनडातील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती पाहता तेथे उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय समुदाय आणि विद्यार्थी उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वेबसाइटवर तक्रारी नोंदवू शकतात.
हिंदू संघटनेचे ट्रूडो सरकारला पत्र
दुसरीकडे, बुधवारी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली होती. यावर कॅनडाच्या हिंदूंनी जस्टिन ट्रुडो सरकारला पत्र लिहिले आहे. पत्रात पन्नूच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त करण्यात आली असून त्याच्यावर हेट स्पीच विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
कॅनेडियन हिंदू संघटना ‘हिंदू फोरम कॅनडा’ने सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लेन यांना हे पत्र लिहिले आहे. पन्नू याने आपल्या सहकाऱ्यांना खलिस्तानी विचारधाराशी सहमत नसलेल्या लोकांना टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा कॅनडियन सरकारने गांभीर्याने विचार करून पन्नू विरुद्ध कारवाई करावी असे या पत्रात नमूद केले आहे. हिंदू कॅनडियन नागरिकांना टार्गेट करण्याचे
पन्नूचे विधान अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कॅनडियन सरकार सहन करणार का??, असा सवालही या पत्रात करण्यात आला आहे.
– जस्टिन ट्रुडो यांचे घुमजाव
टोरंटो स्टारच्या 19 सप्टेंबरच्या वृत्तानुसार, कॅनडाच्या पंतप्रधानांची वृत्ती काहीशी मवाळ दिसून आली. मंगळवारी रात्री कॅनडातील सर्वात मोठ्या वृत्तपत्र ‘टोरंटो स्टार’ने ट्रुडो यांचे विधान प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, कॅनडाच्या सरकारला भारतासोबत तणाव वाढवायचा नाही, पण भारताला हे मुद्दे गांभीर्याने घ्यावे लागतील.
कॅनडाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने ओळख न सांगण्याची इच्छा व्यक्त करताना न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, निज्जर सिंगच्या हत्येची माहिती अनेक देशांच्या मदतीने गोळा करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल. आम्ही तुम्हाला सांगू की कॅनडा हा फाइव्ह आयज नावाच्या इंटेलिजेंस अलायन्सचा एक भाग आहे. कॅनडाशिवाय यात अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे.
पण यापूर्वी, ट्रुडो यांनी खासदारांना सांगितले होते – कॅनडाच्या भूमीवर एका नागरिकाची हत्या करण्यात परदेशी सरकारचा सहभाग हे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. या हत्येच्या तपासात सहकार्य करण्यासाठी आम्ही भारत सरकारवर दबाव आणू.
पंतप्रधान ट्रुडो म्हणाले- कॅनडात राहणारी भारतीय वंशाची शिखांची मोठी लोकसंख्या या हत्येमुळे संतापाने भरलेली आहे. अनेक शिखांना त्यांच्या सुरक्षेची भीती वाटते. देशात सुमारे 18 लाख भारतीय वंशाचे नागरिक आहेत, त्यापैकी बरेच शीख आहेत. कॅनडातील विरोधी पक्ष न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंग हे शीख समुदायातील आहेत.
भारताने फेटाळले कॅनडाचे आरोप
कॅनडाने केलेले सर्व आरोप भारताने फेटाळून लावले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- कॅनडाचे सर्व आरोप हास्यास्पद आहेत. असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधान मोदींवर केले होते आणि ते पूर्णपणे फेटाळले गेले. असे बिनबुडाचे आरोप म्हणजे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी यांच्यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कॅनडात अभय देण्यात आले असून ते भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका आहे. इकडे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचेही वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयशंकर यांनी पंतप्रधानांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.
– कोण होता निज्जर??
18 जून रोजी भारताचा मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर कॅनडात ठार झाला होता. निज्जर हा पंजाबमधील जालंधरमधील भरसिंग पुरा गावचा रहिवासी होता. गावचे सरपंच राम लाल यांनी सांगितले की, निज्जर 1992 मध्ये कॅनडाला गेला होता. तो खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख होता. भारतीय एजन्सीच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.
एनआयएने 40 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती, त्यात निज्जरचेही नाव होते. ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानच्या बाजूने सार्वमत घेण्यातही त्यांची भूमिका होती. पोलिसांनी 23 जानेवारी 2015 रोजी लुकआउट नोटीस आणि 14 मार्च 2016 रोजी निज्जर विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
यामध्ये त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली होती. निज्जरवर कॅनडात 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
कॅनडामध्ये असताना निज्जर बंदी घातलेल्या खलिस्तान समर्थक संघटनेचा शिख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या जवळ आले. पन्नू आणि निज्जर यांच्यातील जवळिकीचा अंदाज यावरून लावता येतो की, निज्जरच्या हत्येपासून पन्नू चिडला होता आणि तो कॅनडात भारताविरुद्ध आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ सार्वमत घेण्याचा दावा करत होता.
India suspends visa services for Canadians amid heightened tensions
महत्वाच्या बातम्या
- कॅनडात पोसल्या जाणाऱ्या खलिस्तानबाबत मोठा खुलासा, पाकिस्तान आणि ISI कनेक्शन आले समोर
- 2 MPs : एमआयएमने दाखविले “रंग”; ओवैसी, इम्तियाज जलील यांचे महिला आरक्षण विरोधात मतदान!!
- द फोकस एक्सप्लेनर : महिला आरक्षण विधेयक लागू होताच काय असेल संसद आणि विधानसभांतील जागांचे गणित? वाचा सविस्तर
- खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र, ‘NIA’ने फोटोसह यादी केली जाहीर