• Download App
    पाकिस्तानमधील मंदिर तोडफोडप्रकरणी भारत सरकारची कठोर भूमिका, परराष्ट्र मंत्रालयाने पाक उच्चायुक्ताला बोलावले । india summons pak high commission official over ransacking of a temple in pakistan

    पाकिस्तानातील मंदिर तोडफोडप्रकरणी भारत सरकारची कठोर भूमिका, परराष्ट्र मंत्रालयाने पाक उच्चायुक्ताला बोलावले

    ransacking of a temple in pakistan :  पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याबाबत भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, पाकिस्तान उच्चायुक्ताच्या प्रभारींना मंदिर तोडफोडप्रकरणी बोलावण्यात आले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध हिंसा आणि अत्याचाराच्या घटनांसह प्रार्थनास्थळांवर हल्ले पाकिस्तानमध्ये चिथावणीशिवाय सुरू आहेत. india summons pak high commission official over ransacking of a temple in pakistan


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याबाबत भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, पाकिस्तान उच्चायुक्ताच्या प्रभारींना मंदिर तोडफोडप्रकरणी बोलावण्यात आले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध हिंसा आणि अत्याचाराच्या घटनांसह प्रार्थनास्थळांवर हल्ले पाकिस्तानमध्ये चिथावणीशिवाय सुरू आहेत.

    पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात जमावाने एका हिंदू मंदिरावर हल्ला केला. मंदिरातील काही भाग जाळण्यात आला आणि मूर्ती फोडण्यात आल्या. हे ठिकाण लाहोरपासून 590 किलोमीटर अंतरावर आहे. कथितरीत्या असे सांगण्यात येत आहे की, मदरशाची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर काही लोकांच्या जमावाने ही मंदिरावर हल्ला चढवला.



    पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे खासदार डॉ. रमेशकुमार वंकवानी यांनी बुधवारी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आणि “जाळपोळ आणि तोडफोड” टाळण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांना लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्याचे आवाहन केले.

    या घटनेसंदर्भात त्यांनी अनेक ट्विट केले. यामध्ये ते म्हणाले, “रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील हिंदू मंदिरावर हल्ला. काल परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होती. स्थानिक पोलिसांचे लाजिरवाणे दुर्लक्ष. मी सरन्यायाधीशांना कारवाई करण्याची विनंती करतो.”

    रहिम यार खानचे जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) असद सरफराज यांनी सांगितले की, सुमारे 100 हिंदू कुटुंबे या परिसरात राहतात आणि कोणतीही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

    india summons pak high commission official over ransacking of a temple in pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!