- हे मिसाईल भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आले आहे. मंगळवारी डीआरडीओने नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिसाईलची चाचणी केली. India successfully test-fired the Vertically Launched Short Range Surface to Air Missile VL-SRSAM
- या मिसाईलची पहिली चाचणी 22 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि नौदलाचे अभिनंदन केले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : डीआरडीओने मंगळवारी जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या कमी अंतराच्या मिसालईची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरून काही अंतरावरील चांदीपूरच्या लक्ष्याला अचूक भेदण्यात आले.मिसाईल व्हर्टिकल लाँचरद्वारे कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून लाँच करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे मिसाईलने लक्ष्य भेदले.यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाचे अभिनंदन केले आहे.
हे मिसाईल भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आले आहे. मंगळवारी डीआरडीओने नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी केली. या मिसाईलची पहिली चाचणी 22 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि नौदलाचे अभिनंदन केले आहे.
हे मिसाईल हवाई हल्ल्यांविरोधात भारतीय नौदलाची ताकद वाढविणार आहे. या मिसाईलची रेंज 50 ते 60 किमी आहे.
तसेच हे मिसाईल जमिनीवरून हवेत मारा करू शकते. म्हणजेच हवेतून येणाऱे विमान किंवा मिसाईल ते क्षणात उध्व्स्त करू शकते.
हे मिसाईल नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल. या मिसाईलच्या चाचणीसाठी बालासोर जिल्हा प्रशासनाने संरक्षणासाठी 2.5 किमीच्या परिघात राहणाऱ्या 4 हजार लोकांना तात्पुरते सुरक्षित स्थळी हलविले होते.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील अभिनंदन केले आहे.
India successfully test-fired the Vertically Launched Short Range Surface to Air Missile VL-SRSAM
महत्त्वाच्या बातम्या