विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत चालू असणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये भारताने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिके समोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त 191 धावाच करू शकला.
India-South Africa Test series: India beat Africa by 113 runs, India in 1-0 lead in the series
टीम इंडियाने 2021 मध्ये 14 कसोटी सामने खेळले आहेत पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर तीन सामने हारले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारताने 2021 ची सुरुवातच विजयाने केली होती विजयानेच सांगता देखील केली आहे. भारताने या वर्षी जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता.
गाबामध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. ज्यामध्ये मोहम्मद सिराजने शानदार बॉल्लिंग केली. सिराजने एकूण 6 विकेट घेतल्या.
टीम इंडियाने 2021 वर्षाचा शेवटही विजयाने केला. सेंच्युरियन येथे भारताने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी 2022 पासून खेळवला जाणार आहे.
India-South Africa Test series: India beat Africa by 113 runs, India in 1-0 lead in the series
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??