वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आकडेवारी धडकी भरवणारी आहे. रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडले असून 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. India reports 3,14,835 new #COVID19 cases, 2,104 deaths and 1,78,841 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
गुरुवारी (22 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण आढळले आहेत. 2,104 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,30,965 पोचली. मृत्यूचा आकडा 1,84,657 वर पोचला आहे. कोरोनाग्रस्तांपैकी 22,91,428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,34,54,880 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे.
India reports 3,14,835 new #COVID19 cases, 2,104 deaths and 1,78,841 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry