• Download App
    देशात २४ तासांत ३११ रुग्ण दगावले, नवीन रुग्णांच्या संख्येत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाढ झाल्याने चिंता । India reports 11,903 new #COVID19 cases and 14,159 recoveries in last 24 hours; active caseload stands at 1,51,209 – lowest in 252 days

    देशात २४ तासांत ३११ रुग्ण दगावले, नवीन रुग्णांच्या संख्येत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाढ झाल्याने चिंता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. दुसरी लाट देशभरात ओसरत आहे. गेल्या २४  तासांत कोरोनाचे ११ हजार ९०३ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या सोमवारी पेक्षा तुलनेने थोडी जास्त आहे. सोमवारी देशात १० हजार ४२ रुग्ण आढळले होते. तर, ४४३ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येसह ३११ जणांचा मृत्यू झाला. तसेच १४ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. India reports 11,903 new #COVID19 cases and 14,159 recoveries in last 24 hours; active caseload stands at 1,51,209 – lowest in 252 days

    देशात सध्या १ लाख ५१ हजार २०९ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. ही रुग्णसंख्या गेल्या २५२ दिवसांतील सर्वात कमी आहे. देशभरात आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.



    गेल्या २४ तासांत देशात ४१ लाख १६ हजार २३० जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १०७ कोटी २९ लाख ६६ हजार ३१६ जणांचं लसीकरण पूर्ण झाले

    राज्यात १ हजार जण कोरोनामुक्त

    राज्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ९५ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १ हजार ७८ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर, ४८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५३,५८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५९ टक्के एवढे झाले आहे.

    India reports 11,903 new #COVID19 cases and 14,159 recoveries in last 24 hours; active caseload stands at 1,51,209 – lowest in 252 days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र