• Download App
    Jaffer Express जाफर एक्स्प्रेस हायजॅकवरून पाकचा आरोप

    Jaffer Express : जाफर एक्स्प्रेस हायजॅकवरून पाकचा आरोप भारताने फेटाळला; 33 बलुच बंडखोरांना ठार केल्याचा पाक लष्कराचा दावा

    Jaffer Express

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Jaffer Express जाफर एक्स्प्रेसवरील बलुचांच्या हल्ल्यात हात असल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने केलेला आराेप भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी हे विधान केले हाेते. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही ठामपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःच्या अंतर्गत समस्यांकडे लक्ष द्यावे. दरम्यान, रेल्वे हायजॅक करणाऱ्या ३३ बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) बंडखोरांना ठार केल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.Jaffer Express



    दरम्यान, बीएलएचे प्रवक्ते जियंद बलुच यांनी सांगितले की “लढाई अजूनही अनेक आघाड्यांवर सुरू आहे.” पाकिस्तानी लष्कराने ना युद्धभूमीवर विजय मिळवला आहे ना त्यांच्या बंधक कर्मचाऱ्यांना वाचवले आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सैनिकांना वाऱ्यावर साेडले आहे.

    महिला, मुले आणि वृद्धांना बंधमुक्त केले

    अपहृत रेल्वेतून सुटका झाल्यानंतर क्वेटा येथे पोहोचलेल्या प्रवाशांनी पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की बलुच लढवय्यांनी रेल्वेगाडी ताब्यात घेतल्यानंतर महिला, मुले आणि वृद्ध व्यक्तींना स्वेच्छेने मुक्त केले. बलुचांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना स्वतंत्र पत्रकार आणि निष्पक्ष निरीक्षकांना संघर्ष क्षेत्रात प्रवेश देण्याचे आव्हान दिले आहे. गटाचा दावा आहे की लष्कराच्या अशा प्रवेशास नकार देणे त्यांच्या “पराभवाचे” प्रदर्शन आहे.

    बंडखाेरांना मारल्यावरूनही आरोप-प्रत्यारोप

    रेल्वे हायजॅकनंतर क्वेटा येथे सेवा थांबविण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकात असलेला शुकशुकाट. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाफर एक्स्प्रेस हायजॅक करणाऱ्या ३३ बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) बंडखोरांना ठार केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराने या “यशस्वी ऑपरेशन’चे कोणतेही छायाचित्र किंवा व्हिडिओ प्रसिद्ध केलेले नाहीत. दुसरीकडे, बंडखोर बीएलएने आयएसपीआरवर पराभव लपवण्याचा आरोप केला आहे.

    India rejects Pakistan’s allegations over Jaffer Express hijack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : ‘मी नेहरूंचा अंध समर्थक नाही, पण त्यांची लोकशाहीतील भूमिका अमूल्य’ – शशी थरूर यांची भाजपवर संयत टीका

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- नेहरूंच्या चुका स्वीकारणे आवश्यक, पण प्रत्येक समस्येसाठी त्यांना एकट्याला दोषी ठरवणे चुकीचे

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते