• Download App
    दिल्लीने फेटाळला बिजिंगचा दावा । INDIA rejected Beijing’s claim that the Galwan valley incident took place because India violated all agreements and encroached upon China’s territory.

    दिल्लीने फेटाळला बिजिंगचा दावा

    क्वाड बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेल्याने चीनची बेचैनी वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी गेल्यावर्षी गलवान खोऱ्यात उसळलेल्या संघर्षावरुन चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला भारताने तातडीने प्रत्युत्तर दिले. INDIA rejected Beijing’s claim that the Galwan valley incident took place because India violated all agreements and encroached upon China’s territory.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताने चीनच्या प्रदेशावर आक्रमण केल्याने तसेच यापूर्वीच्या करारांचा भंग केल्यामुळे गलवान खोऱ्यात संघर्षाची स्थिती उद्भवली असा चीनने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.

    भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, “अशी विधाने आम्ही नाकारतो. पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या प्रसंगांबाबत आमची नेहमीच भूमिका स्वच्छ आणि सातत्यपूर्ण राहिली आहे. चीनने त्यांच्या बाजूने प्रक्षोभक हालचाली केल्या. द्विपक्षीय करारांचे उल्लंघन करुन सद्यस्थिती बिघडवण्याचा त्यांचा एकतर्फी प्रयत्न होता. चीनच्या चिथावणीखोर वर्तनामुळे शांतता राखण्याच्या प्रयत्नांमध्ये गंभीर अडथळा निर्माण झाला.”



    आदल्याच दिवशी क्वाड परिषदेसंदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजन यांनी म्हटले होते की, इतर देशांना लक्ष्य करणारे प्रयत्न आणि महत्वाकांक्षा प्रदेशातल्या काही देशांकडून दिसतात. मात्र त्याला कोणतेही समर्थन मिळणार नाही. ते अपयशी ठरले आहेत. लीजन म्हणाले, संबंधित देशांनी चीनच्या विकास प्रक्रियेकडे योग्य नजरेने पाहिले पाहिजे. त्याचवेळी या क्षेत्रातील देशांची एकता आणि सहकार्य बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

    INDIA rejected Beijing’s claim that the Galwan valley incident took place because India violated all agreements and encroached upon China’s territory.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट