• Download App
    पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्यावर भारताची कारवाई, कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश India reacts to Prime Minister Trudeaus statement orders Canadian High Commissioner to leave the country within five days

    पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्यावर भारताची कारवाई, कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश

    भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांना बोलावले आणि…

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव वाढला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताविरोधात वक्तव्य केले होते. याशिवाय, हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर कॅनडाने एका भारतीय अधिकाऱ्याची  हकालपट्टी केली आहे. यावर भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. India reacts to Prime Minister Trudeaus statement orders Canadian High Commissioner to leave the country within five days

    भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “पंतप्रधान ट्रूडोचे आरोप निराधार आहेत.  पंतप्रधानांनी केलेली अशी विधाने खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांकडून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे, ज्यांना कॅनडात आश्रय मिळत आहे.”

    त्याच वेळी, बुधवारी सकाळी भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांना बोलावले आणि कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भारतातून बाहेर काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

    कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची  हकालपट्टी –

    “भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांना आज बोलावण्यात आले आणि भारतातील एका वरिष्ठ कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यात आली,” असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

    परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, “संबंधित अधिकाऱ्याला पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. हा निर्णय कॅनडाच्या अधिकाऱ्यांचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो.”

    India reacts to Prime Minister Trudeaus statement orders Canadian High Commissioner to leave the country within five days

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य