• Download App
    भारत जोडो यात्रेची थकावट दूर करण्यासाठी राहुल गांधींची सुट्टी; पण ती यावेळी देशांतर्गतच!!; गुलमर्ग मध्ये स्कीईंगचा आनंद india rahul gandhi gulmarg went skiing in gulmarg in north kashmir

    भारत जोडो यात्रेची थकावट दूर करण्यासाठी राहुल गांधींची सुट्टी; पण ती यावेळी देशांतर्गतच!!; गुलमर्ग मध्ये स्कीईंगचा आनंद

    वृत्तसंस्था

    गुलमर्ग : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या परदेशातल्या सुट्ट्यांची नेहमीच माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये विविध प्रकारची चर्चा रंगत असते. मात्र यावेळी राहुल गांधींनी तब्बल 124 दिवस केलेल्या भारत जोडो यात्रेची थकावट दूर करण्यासाठी त्यांनी भारतातल्याच डेस्टीनेशनची निवड केली आहे. india rahul gandhi gulmarg went skiing in gulmarg in north kashmir

    राहुल गांधींनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इटली किंवा कोणताही युरोपीय देश अथवा कोलंबिया – मालदीव या देशांची निवड न करता जम्मू – काश्मीर मधल्या गुलमर्गची निवड केली आहे. तेथे ते सध्या सुट्टीचा आनंद घेत भारत जोडो यात्रेची थकावट दूर करत आहेत. गुलमर्ग मध्ये बर्फात त्यांनी स्कीईंगचा आनंद लुटला. त्याचबरोबर त्यांनी गोंडोला कार राईडचा अनुभवही घेतला.

    राहुल गांधी यांची ही सुट्टी प्रामुख्याने देशांतर्गत असल्याने ती मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण आतापर्यंत राहुल गांधींनी वर्षाअखेरीची सुट्टी अथवा अधून मधून घेतलेली सुट्टी ही नेहमी कुठेतरी पदेशात एखाद्या बेटावर अथवा युरोप, अमेरिका, कोलंबिया, मालदीव सारख्या देशांमध्ये साजरी केली आहे. त्यामुळे ते अनेकदा विरोधकांच्या विशेषतः भाजप नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य देखील ठरले आहेत. पण या टीकेकडे राहुल गांधींनी फारसे कधी लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्या सुट्टीचा आनंद घेणे, तोही परदेशात हे आत्तापर्यंत चालूच ठेवले होते.

    परंतु त्यांनी नुकतीच 124 दिवसांची 3000 किलोमीटर पेक्षा जास्त भारत जोडो यात्रा पूर्ण केली. त्यामुळे आलेली थकावट दूर करण्यासाठी त्यांनी परदेशात जाण्यापेक्षा भारतातच राहून सुट्टीचा आनंद लुटण्याचे ठरवले आणि त्यांनी काश्मीर मधल्या गुलमर्गची निवड केली. त्यामुळे राहुल गांधींची ही सुट्टी वेगळ्या अर्थानेही चर्चेचा विषय ठरली आहे.

    india rahul gandhi gulmarg went skiing in gulmarg in north kashmir

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!