• Download App
    Michael Rubin

    पाकिस्तान भित्र्या कुत्र्याप्रमाणे दोन पायात शेपूट घालून शस्त्रसंधीसाठी धावला; अमेरिकन पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने काढली इज्जत!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचा भारताने एवढा दारुण पराभव केला की पाकिस्तान भित्र्या कुत्र्याप्रमाणे दोन पायांमध्ये शेपूट घालून अमेरिकेकडे शस्त्रसंधीसाठी धावला, अशा बेक्कार शब्दांमध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने पाकिस्तानची इज्जत काढली. इतकेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकन जनता गांभीर्याने पाहत नाही कारण ते प्रत्येक गोष्टीचे श्रेय घ्यायला धावतात, अशा शब्दांमध्ये या अधिकाऱ्याने अमेरिकन अध्यक्षांचीही पत्रास ठेवली नाही.

    पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे फेलो मायकेल रूबिन यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या भारत – पाकिस्तान संघर्षावर अतिशय परखड भाष्य केले. हे भाष्य करताना त्यांनी पाकिस्तानातले दारुण वास्तव तर मांडलेच, पण अमेरिकेच्या अध्यक्षांची देखील पत्रास ठेवली नाही.

    मायकेल रूबिन म्हणाले :

    पाकिस्तान विरुद्धच्या चार दिवसांच्या युद्धात भारताने आपली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यंत्रणा सक्षमपणे वापरून वर्चस्व सिद्ध केले. हे वर्चस्व सगळ्या जगाने पाहिले.

    पण पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना जेव्हा धक्का लागला, तेव्हा पाकिस्तान घाबरले. पाकिस्तान भित्र्या कुत्र्याप्रमाणे दोन पायांमध्ये शेपूट घालून अमेरिकेकडे धावला. भारताने शस्त्रसंधी करावी. पण भारत त्यासाठी चीनचे ऐकणार नाही त्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी करून भारताकडून शस्त्रसंधी करून घ्यावी, अशी गळ घाबरलेल्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी अमेरिकेला घातली.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले. पण डोनाल्ड ट्रम्प हे असे गृहस्थ आहेत की ते कुठेही गोष्टीचे श्रेय स्वतःकडे ओढून घेऊ शकतात. उद्या जर कोणी म्हटले की इंटरनेटचा शोध डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला, वर्ल्ड कप त्यांनी एकहाती जिंकून दिला, कॅन्सर वरचे औषध त्यांनी शोधले, तर या सगळ्या गोष्टींचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प स्वतःवर ओढून घेऊ शकतात. पण अमेरिकेतली जनता त्यांना एवढे “सिरीयसली” घेत नाही. भारताने देखील त्यांच्या श्रेय ओढून घेण्याचा अर्थ एवढा “सिरीयसली” घेऊ नये.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले ते प्रत्येक युद्ध पाकिस्तानने स्वतःहून सुरू केले. पण प्रत्येक युद्धामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा पाकिस्तान अपमानास्पद रित्या हरले. भित्र्या कुत्र्याप्रमाणे पायात शेपूट घालून शस्त्रसंधीसाठी धावले.

    भारत – पाकिस्तानच्या प्रत्येक युद्धानंतर अमेरिकेने नेहमीच मध्यस्थी केली. त्यासाठी दोन्ही देशांच्या मान्यता अमान्यतेकडे अमेरिकेने लक्ष दिले नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचे श्रेय ओढून घेतले तरी त्यात नवीन काही नाही.

    India-Pakistan conflict, former Pentagon official and a senior fellow at the American Enterprise Institute, Michael Rubin

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court Lawyer : सर्वोच्च न्यायालयाबाहेर वकिलाची श्वानप्रेमीला मारहाण; दिल्ली-NCRमध्ये भटक्या कुत्र्यांवर बंदीविरोधात आंदोलन करत होता

    रघुराम राजन यांच्या बुद्धीभेदाला अमिताभ कांत यांचा उतारा; भारताला चीन बरोबर उत्पादन क्षेत्रात उतरवा!!

    NPCI Bans : 1 ऑक्टोबरपासून UPI द्वारे पैशाची मागणी पाठवता येणार नाही; NPCIचा फसवणूक रोखण्यासाठी मोठा निर्णय