• Download App
    कोरोना लसीकरणात भारत जगात अव्वल, विकसित राष्ट्रांच्या जी-७ देशांनी मिळून ऑगस्टमद्ये दिले १० कोटी डोस तर भारतामध्ये एकाच महिन्यात १८ कोटी|ndia, one of the world's leading G7 nations in corona vaccination, G 7 gave 100 million doses in August, while India gave 180 million doses in a single month.

    कोरोना लसीकरणात भारत जगात अव्वल, विकसित राष्ट्रांच्या जी-७ देशांनी मिळून ऑगस्टमद्ये दिले १० कोटी डोस तर भारतामध्ये एकाच महिन्यात १८ कोटी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना लसीकरणात भारताने संपूर्ण जगाला दिपविणारी कामगिरी केली आहे. जी-सात नावाने ओळखल्या जाणाऱ्या विकसित देशांनी सर्वांनी मिळून केलेल्य लसीकरणापेक्षा जास्त लसीकरण एकट्या भारताने केले आहे. जी-७ देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे १०.१ कोटी डोस ऑगस्ट महिन्यात दिले गेले. भारतामध्ये याच महिन्यात तब्बल १८ कोटी डोस देण्यात आले आहे.India, one of the world’s leading G7 nations in corona vaccination, G 7 gave 100 million doses in August, while India gave 180 million doses in a single month.

    कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हेच शस्त्र आहे हे ओळखून भारताने काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत ६८ कोटी लसींचे डोस दिले गेले आहेत. कॅनडा, ब्रिटेन, इटली, जर्मनी, फ्रांस, अमेरिका आणि जापान या सात देशांनी एकूण दिलेल्या डोसपेक्षा भारताने जास्त डोस दिले आहेत.



    ऑगस्ट महिन्यात जपानमध्ये सर्वाधिक ४ कोटी डोस दिले गेले. त्यानंतर अमेरिकेत २.३ कोटी, फ्रान्स १.३ कोटी, जमर्नी ९० लाख, इटली ८० लाख, ब्रिटन ५० लाख आणि कॅनडामध्ये ३० लाख डोस देण्यात आले.
    भारतामध्ये ५० कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

    ३१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी १.४१ कोटी लसींचे डोस देण्यात आले होते. भारतामध्ये १६ जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेची सुरूवात करण्यात आली.भारतामध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि रशियाची स्फुतनिक व्ही या तीन लसी दिल्या जात आहेत.

    India, one of the world’s leading G7 nations in corona vaccination, G 7 gave 100 million doses in August, while India gave 180 million doses in a single month.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य