विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : किरकोळ आव्हानाच्या सामन्यात डोके शांत ठेवून “हेड” लढला आणि ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप घेऊन गेला, असे म्हणायची वेळ अहमदाबाद मधल्या वर्ल्ड कप फायनल सामन्याने आणली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. India loss world cup final 2023 india vs australia
भारताचे 241 धावांचे किरकोळ आव्हान ऑस्ट्रेलियन फक्त 4 विकेट्स गमावून पार केले. त्यामध्ये ट्रॅव्हिस हेडचे शतक निर्णय ठरले. त्याला मार्न्स लॅबोसेन याने चांगली साथ दिली.
तब्बल 11 सामने अजिंक्य राहुन फायनल मध्ये पोहोचलेला धडाकेबाज भारतीय संघ नेमका फायनल मध्ये आपला धडाका गमावून बसला. रोहित शर्मा (47) सुपरस्टार बॅटर विराट कोहली (54) आणि विकेटकीपर के. एल. राहुल (66) एवढीच काय ती फिकी चमक फलंदाजी दाखवली, पण ती भारतीय संघासाठी पुरेशी उपयोगी ठरली नाही.
भारतीय गोलंदाज संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये चमत्कार दाखवू शकले होते. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चारही बलाढ्य संघांना भारताने गोलंदाजांच्या चमत्काराच्या बळावर साखळी सामन्यांमध्ये पराभूत केले होते. पण फायनल मध्ये जसप्रीत बुमराह सोडला, तर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव हे गोलंदाज बिल्कुलच चमक दाखवू शकले नाहीत.
मोहम्मद शमीने 16 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यावेळी भारतीयांच्या मनात पुन्हा अशा निर्माण झाली होती, पण त्यानंतर बुमराहने घेतलेल्या 2 विकेट्स सोडल्या, तर भारतीय गोलंदाजांनी पूर्ण निराशा केली. ट्रॅव्हिस हेडने खरंच आपले डोके शांत ठेवून भारताचे किरकोळ आव्हान आपल्या शतकासह पार करून टाकले. त्याला मार्न्स लॅबोसेन याने उत्तम साथ देत अर्धशतक पूर्ण केले.
वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला एवढीच काय ती भारतीय संघाची मोलाची कामगिरी ठरली.
India loss world cup final 2023 india vs australia
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा महामुकाबला!
- ‘IDF’ने घेतला बदला! जर्मन-इस्रायली तरुणीला जीपमधून नग्न फिरवणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला केले ठार
- राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल करणाऱ्या पूर्णेश मोदींना भाजपाने दिली मोठी जबाबदारी
- अभिमानास्पद! टाइम मॅग्झिनच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आठ भारतीय