• Download App
    Asaduddin Owaisi राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या

    Asaduddin Owaisi : राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानावरून ओवैसींचा काँग्रेसला टोला!

    Asaduddin Owaisi

    ओवैसी नुकतेच भारतीय शिष्टमंडळासोबत परदेशात जाऊन ऑपरेशन सिंदूरबाबत देशाची भूमिका मांडून आले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Asaduddin Owaisi ऑपरेशन सिंदूरवरील राजकीय विरोध विसरून आयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि शशी थरूर यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी परदेशात भारताची बाजू जोरदारपणे मांडली आहे, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी या युद्धाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आत्मसमर्पण म्हणत आहेत. ओवेसी मंगळवारीच भारतात परतले आणि मायदेशी परतताच त्यांनी राहुल गांधींच्या विधानापासून स्वतःला दूर केले. Asaduddin Owaisi

    ओवेसी म्हणाले की काँग्रेस नेत्यांनी राहुल यांना कसे समजावून सांगायचे, त्यांच्या विधानावर कशी प्रतिक्रिया द्यायची याचा विचार करावा. तर ओवैसींबाबत सांगायचं झालं तर २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि युद्धबंदीवर नक्कीच प्रश्न विचारणार आहेत.



    राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींबद्दल विधान केले होते आणि म्हटले होते की, ‘ट्रम्पने तिथून फोन करून सूचित केले की तुम्ही काय करत आहात मोदीजी? नरेंद्र, आत्मसमर्पण करा आणि ‘हो सर’ असे म्हणत मोदीजींनी ट्रम्पच्या सूचनांचे पालन केले.’

    राहुल गांधी यांचे विधान पाकिस्तानला अनुकूल असल्याने, पाकिस्तानमधील प्रत्येक वृत्तवाहिनीने राहुल गांधी यांच्या विधानाला हेडींग बनवले आणि त्यावर चर्चाही केली आहे. पाकिस्तानमधील बहुतेक टीव्ही चॅनेल राहुल गांधींच्या विधानाच्या बहाण्याने भारत आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत आहेत.

    India is under attack from Rahul Gandhis refugee legislation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rakesh Kishor : CJI हल्ला; आरोपी वकिलाचे बार असोसिएशन सदस्यत्व रद्द, बंगळुरूमध्ये FIR

    नोबेल समितीने हिरावला उतावळ्याचा पुरस्कार; पण वाचा नोबेल ecosystem चा चमत्कार!!

    Mayawati : यूपीमध्ये मायावतींकडून योगी सरकारचे कौतुक; सपाला म्हटले दुटप्पी पार्टी; लखनऊमध्ये 9 वर्षांनंतर सभा