वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारतात जाऊ इच्छिणाऱ्या अमेरिकी नागरिकांना येथील सरकारने दिलासा दिला असून भारतात संसर्गाचा धोका कमी असल्याचे सांगणारा ‘लेव्हल-१’ कोविड इशारा सरकारने जारी केला आहे. भारतात संसर्गाचा धोका कमी झाला असून लसीकरण पूर्ण झाले असल्यास बाधित होण्याची शक्यता अत्यल्प आहे, असे याद्वारे सूचित करण्यात आले आहे. India is safe for travelling says USA
भारतातील कोरोना संसर्गस्थितीत सुधारणा झाल्याने सरकारने सुधारित सूचना जारी केल्या आहेत. मात्र, भारतात प्रवास करताना हिंसाचार आणि दहशतवादाच्या घटनांमुळे जम्मू-काश्मीेरसह भारत-पाकिस्तानच्या सीमाभागात जाणे टाळावे, असा सल्लाही पर्यटकांना देण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये जाण्याचा मात्र अमेरिकी नागरिकांनी फेरविचार करावा, आणि गेल्यास बलुचिस्तान भागात जाणे टाळावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
India is safe for travelling says USA
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य शासनाकडून आता धमक्या, हजर व्हा, अन्यथा कामावरून काढणार, एसटीतील २२९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोटीस
- आज २०० कोटींहून अधिक डोस राज्यांकडे उपलब्ध : अदार पूनावाला
- हळदीच्या कार्यक्रमात बेकायदा वाद्यवादन, नाशिकमध्ये पोलिस मंडपामध्ये धडकले; नवरदेवासह वाजंत्र्यावरही गुन्हा दाखल
- पाकव्याप्त भूभाग प्रथम आमच्या ताब्यात द्या; संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानला खडसावले