विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Piyush Goyal अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ‘डेड इकॉनॉमी’ अशी टोकाची टीका करत रशियासोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत ठाम शब्दांत त्यांना प्रत्युत्तर दिले. गोयल म्हणाले, “भारत मृत नव्हे तर जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आणि लवकरच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, हे निश्चित आहे.”Piyush Goyal
गोयल यांनी संसदेत सांगितले की, भारताने केवळ एका दशकात ११व्या क्रमांकावरून ५व्या क्रमांकावर झेप घेतली असून, आता भारत ‘फ्रॅजाईल फाइव्ह’मधून बाहेर पडला आहे आणि जगभरातील अर्थतज्ज्ञ भारताला ‘ब्राईट स्पॉट’ म्हणून ओळखत आहेत. “शेतकरी, लघु-मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, आणि धोरणात्मक सुधारणांच्या जोरावर भारताने ही भरारी घेतली आहे. ही यशोगाथा केवळ आकड्यांत नाही, तर भारताच्या वाढत्या आत्मविश्वासातही दिसते,” असं गोयल म्हणाले.Piyush Goyal
ट्रम्प यांनी केलेल्या वादग्रस्त विधानात म्हटले होते, “मला काही फरक पडत नाही भारत रशियासोबत काय करतो. ते त्यांची डेड इकॉनॉमी घेऊन बुडू शकतात.” यावर प्रत्युत्तर देताना गोयल म्हणाले, “भारतविषयी अशा वक्तव्यांमध्ये कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही. भारत जगाच्या आर्थिक भविष्यासाठी केंद्रस्थानी आहे. अशा वक्तव्यांमागे केवळ राजकीय हेतू आहेत.”
पियुष गोयल यांनी नमूद केले की भारताचा परकीय चलन साठा सध्या $690 अब्ज च्या आसपास आहे. महागाई दर नियंत्रित असून, स्थिर आर्थिक वाढ ६–७% दराने सुरू आहे. सरकारचे उद्दिष्ट ही वाढ ८% च्या पातळीवर नेणे हे आहे.
गोयल म्हणाले की, भारताने संयुक्त अरब अमिरात, यूके, ऑस्ट्रेलिया, आणि EFTA राष्ट्रांशी यशस्वी मुक्त व्यापार करार केले आहेत. सध्या अमेरिका, युरोपियन युनियन, न्यूझीलंडसह महत्त्वपूर्ण FTA वाटाघाटी सुरू आहेत. यामुळे भारताच्या जागतिक व्यापारासह थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) मोठी चालना मिळेल.
१ ऑगस्टपासून अमेरिकेने भारताच्या काही वस्तूंवर २५% आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने निर्यातदार, उद्योग प्रतिनिधी, आणि व्यावसायिक संघटनांशी सल्लामसलत सुरू केली आहे. गोयल म्हणाले, “या निर्णयाचा देशाच्या उद्योगांवर काय परिणाम होईल याचा सखोल अभ्यास सुरू आहे. आम्ही सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करत आहोत.”
India is not a ‘dead economy’, but the fastest growing economy in the world, Piyush Goyal’s reply to Trump
महत्वाच्या बातम्या
- रामकुंडावर राष्ट्रभावनेची आरती; उद्या 1 ऑगस्टला गोदावरी सेवा समितीच्या आयोजनात सिख परंपरेचे संत, राष्ट्रीय मान्यवर सहभागी
- Saudi Arabia : सौदी अरेबियात परदेशी नागरिकही खरेदी करू शकतील मालमत्ता; तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश
- Operation Shivshakti : लष्कराचे ऑपरेशन शिवशक्ती, पूंछमध्ये 2 दहशतवादी ठार; तीन शस्त्रे आणि दारूगोळादेखील जप्त
- Bengaluru : बंगळुरूतून 30 वर्षीय शमा परवीनला अटक; गुजरात ATSचा दावा- अल कायदा मॉड्यूलशी संबंध