मिशन चांद्रयान-3 वर केवळ भारताच्याच नाही तर जगभरातील वैज्ञानिकांसह सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने चंद्रावर इतिहास रचला. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगमुळे भारताने जगात यशाचा झेंडा फडकवला आहे. इस्रोला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे. मिशन चांद्रयान-3 वर केवळ भारताच्याच नाही तर जगभरातील वैज्ञानिकांसह सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या होत्या. चांद्रयान चंद्रावर उतरण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, तसे लोकांच्या हृदयाचे ठोकेही वाढत होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक ‘मून मिशन’च्या यशासाठी मंदीर, मशीद, गुरुद्वारासह सर्वच ठिकाणी प्रार्थना करत होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मधून इस्त्रोशी जुडलेले होते. INDIA IS GREAT India created a new history Chandrayaan 3 successful landing on the moon
चांद्रायनाने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांसह समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण भारतासाठी नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताच्या यशाचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडलं गेलं होतं.”
INDIA IS GREAT India created a new history Chandrayaan 3 successful landing on the moon
महत्वाच्या बातम्या
- निष्ठावंत नेत्यांना 75 व्या वर्षी निवृत्त करणारे भाजपचे बॉस पवारांना 83 व्या वर्षी कुठली ऑफर देतील??
- ‘CBI’ने राहुल गांगल यास केली अटक! भारतीय संरक्षणाची गोपनीय कागदपत्रे इतर देशांना पुरवल्याचा आरोप
- 2023 चा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित; सिंधुदुर्गावर भव्य आयोजन!!
- चांद्रयान-3च्या लँडिंग दरम्यान पंतप्रधान मोदी व्हर्चुअली ‘इस्रो’शी जुडणार!