India Industrial production : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जुलैसाठी IIP (औद्योगिक उत्पादन निर्देशांक) डेटा जारी केला आहे. जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन 11.5 टक्क्यांनी वाढले. जुलै 2020 मध्ये त्यात 10.50 टक्के घट नोंदवण्यात आली होती. India Industrial production grows 11.5 pc in July Shows Govt data
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जुलैसाठी IIP (औद्योगिक उत्पादन निर्देशांक) डेटा जारी केला आहे. जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन 11.5 टक्क्यांनी वाढले. जुलै 2020 मध्ये त्यात 10.50 टक्के घट नोंदवण्यात आली होती. NSOच्या अहवालानुसार, जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन महिन्याच्या आधारावर 7.2 टक्के वाढले. मासिक आधारावर, जूनमध्ये केवळ 5.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली. याचा अर्थ, जुलैमध्ये आर्थिक गती वाढली आहे. वार्षिक आधारावर, जूनमध्ये आयआयपी 13.60 टक्क्यांनी वाढला आहे. हा वेग सुधारित डेटावर आधारित आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाला (IIP) कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व आहे. यावरून संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक वाढ कोणत्या वेगाने होत आहे हे कळते. देशाच्या उत्पादन, सेवा क्षेत्रात आर्थिक मंदीचा काळ सुरूच असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत देशातील खासगी क्षेत्र गुंतवणूक करण्यास कचरत आहेत. त्यामुळेच अनेक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कामावरून काढून टाकण्याचे प्रकार घडत आहेत.
उत्पादनात 10.50% वाढ
एनएसओने शेअर केलेल्या अहवालानुसार, उत्पादन क्षेत्रातील आउटपूटमध्ये 10.50 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. खाण उत्पादन 19.50 टक्के आणि वीज निर्मिती 11.10 टक्के वाढली आहे.
एप्रिल-जुलैमध्ये 34.10 टक्के वाढ
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलैदरम्यान औद्योगिक उत्पादन 34.10 टक्के राहिले. 2020 मध्ये एप्रिल-जुलैदरम्यान आयआयपीमध्ये 29.30 टक्के घट झाली होती.
India Industrial production grows 11.5 pc in July Shows Govt data
महत्त्वाच्या बातम्या
- मायावतींनी आत्तापर्यंत पोसलेले गुंड आता चालले ओवैसींच्या आश्रयाला; आधी अतिक अहमद, आता मुख्तार अन्सारीला ऑफर
- संतापजनक : मुंबईत ‘निर्भया’सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, प्रकृती गंभीर
- West Bengal Bypolls : पोटनिवडणुकीसाठी ममतांचा भवानीपूरमधून अर्ज दाखल, भाजपकडून प्रियांका टिबरेवाल यांचे आव्हान
- भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर पलटवार, म्हणाले – नेहरूंच्या तुष्टीकरणामुळे काश्मीरची समस्या कायम
- मोठी बातमी : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा दहा चौरस किमी परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित, मांस आणि मद्यविक्रीवर बंदी