वृत्तसंस्था
मेलबर्न : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नवा ट्वीस्ट आला आहे. आता स्पर्धेत मोठा उलटफेर झाला असून नेदरलॅंड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आयत्यावेळी अवसानघात हा दक्षिण आफ्रिकेला लागलेला शाप आहे. यामुळे पुन्हा एकदा तो संघ “चोकर” ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे. नेदरलॅंड दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केल्याने ‘ब’ गटातील संपूर्ण समीकरण बदलले आहे. India in the semi-finals of the T-20 World Cup
BCCI चा ऐतिहासिक निर्णय; भारतीय स्त्री – पुरुष क्रिकेटर्सना समान वेतन!!
भारतीय संघ उपांत्य फेरीत
गेल्या अनेक विश्वचषक स्पर्धेत साऊथ आफ्रिका हा बलाढ्य संघ कधी पावसामुळे तर कधी ऐनवेळी खराब प्रदर्शन करून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा आणि ब गटातून पहिला संघ ठरला आहे. गट अ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश झाला आहे.
नेदरलॅंडच्या विजयाने समीकरणे बदलली
नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्याने गट ब ची समीकरणे बदलली आहेत. भारताने थेट उपांत्य फेरी गाठली असून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश या दोघांपैकी एक संघ गट ब मधून भारतासमवेत उपांत्य फेरीत पोहोचेल.
India in the semi-finals of the T-20 World Cup
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात मोठी नोकर भरती; आरोग्य खात्यात 10568 जागा, तर ग्रामविकास मध्ये 11000 जागा
- प्रफुल्ल पटेल विचारतात, राष्ट्रवादी नंबर 1 वर का नाही?; पण पक्षाचे मिशन 100 वरच मर्यादित
- The Kerala Story : 32000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि येमेन – सीरियात दहशतवादी गुलाम म्हणून विक्री!!