यापूर्वी भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथे पदक मिळाले आहे. भारतीय हॉकी संघाने भारतासाठी चौथे कांस्यपदक जिंकले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला आहे. भारतीय हॉकी संघ सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. यापूर्वी भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली, मात्र एकही गोल करण्यात यश आले नाही, मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने पेनल्टीवर गोल केला. स्पेनसाठी मार्क मिरालेसने हा गोल केला. पण त्यानंतर त्याच क्वार्टरमध्ये भारताने शेवटच्या मिनिटांत पुनरागमन केले आणि हरमनप्रीत सिंगने शानदार गोल केला.
यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दुसरा गोल केला. कर्णधार हरनप्रीत सिंगने दुसरा गोल केला. त्याने 33व्या मिनिटाला हा गोल केला आणि भारताने 2-1 अशी आघाडी घेतली. यानंतर स्पेनला अनेक पेनल्टी मिळाल्या, पण भारतीय संघाचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश याने स्पेनला त्यांचा हेतू सफल होऊ दिला नाही. तिसरा आणि चौथा क्वार्टर संपूर्णपणे भारताच्या नावावर होता. गोलकीपर पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत जर्मनीकडून 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारताचे फायनल खेळण्याचे स्वप्नही भंगले.
India hockey Team won bronze medal in Olympic
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : मनोज जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांना चढला हुरूप, बैठका + कार्यक्रमांना दिला वेग!!
- MVA parties : कुणी नाही मोठे, सगळेच छोटे; महाविकास आघाडी बनली तिळ्यांचे दुखणे!!
- Arvind Kejriwal : ‘अरविंद केजरीवाल यांना पुन्हा अटक करणार का?’ ; उच्च न्यायालयाचा EDला सवाल!
- Nepals Kathmandu : नेपाळमध्ये आणखी एक हवाई दुर्घटना, काठमांडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू