विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : व्हीपीएन ब्रॅन्ड सर्फशार्कने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार असे सिद्ध झाले आहे की, भारतात जगातील सर्वात स्लोव्ह स्पीड मोबाइल इंटरनेट आहे. या सर्व्हेसाठी जगभरातील 6.9 अब्ज लोकांचे सर्वेक्षण केले गेले. इंटरनेट परवडणारी क्षमता, इंटरनेटची गुणवत्ता, इलेक्ट्रॉनिकच्या पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक सरकार या मुद्द्यांना लक्षात घेऊन हे सर्वेक्षण केले गेले होते.
India has world’s slowest mobile Internet speed says surfshark’s survey
भारत इंटरनेट परवडण्याच्या श्रेणीमध्ये 47 व्या स्थानावर आहे. तर इंटरनेटची गुणवत्ता ह्या श्रेणीमध्ये 67 व्या स्थानावर आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या पायाभूत सुविधांमध्ये 91 व्या स्थानावर आहे. तर इलेक्ट्रॉनिक्सच्या सुरक्षा या कॅटेगरीमध्ये 36 व्या स्थानावर आहे आणि इलेक्ट्रॉनिक गव्हर्मेंट या कॅटेगरीमध्ये 33 व्या स्थानावर आहे.
भारतातील इलेक्ट्रॉनिक्स सिक्युरिटी चीनच्या तुलनेमध्ये मागील गेल्या वर्षीपेक्षा चांगली असल्याचे दिसते आहे. इंटरनेटचा एकूण वापर करणाऱ्या युजर्सच्या संख्येच्या बाबतीत भारत 95 व्या स्थानावर आहे. तर वर सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार करून डेन्मार्कने या लिस्टमध्ये बाजी मारली आहे. त्याच्यानंतर साऊथ कोरिया आणि फिनलंड हे देश येतात.
India has world’s slowest mobile Internet speed says surfshark’s survey
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम केअर्स फंड हा सरकारी निधी नाही, केंद्राचे न्यायालयात शपथपत्र
- न्यायाधीश आनंद यांना हत्येसाठी जाणीवपूर्वक धडक : सीबीआयची न्यायालयात माहिती
- पुण्यातील निर्बंध ऑक्टोबरपासून शिथिल; पालकमंत्री अजित पवार यांचे कोरोना आढावा घेतल्यावर संकेत
- सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भरता, स्टार्ट अप्स, स्किल डेव्हलपमेंट संकल्पनांची मूळे दीनदयाळजींच्या “सबको काम” अर्थनीती मध्ये!