भारतातील महिला वैमानिकांची संख्या ही संख्या परदेशांतील महिला वैमानिकांच्या संख्येच्या तुलनेत तिप्पट आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय महिला आज जमिनीपासून अक्षरशा आकाशापर्यंत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. जगभरात विमान पायलट हे क्षेत्र सर्वसाधारणपणे पुरुषांची मक्तेदारी मानले जाते. जागतिक आकडेवारीनुसार, दर १०० वैमानिकांपैकी केवळ पाच महिला आहेत. परंतु, भारत याला अपवाद आहे, कारण भारतात ही परिस्थिती जगातील अन्य देशांच्या तुलनेत अगदी उलट आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतातील महिला वैमानिकांची संख्या ही संख्या परदेशांतील महिला वैमानिकांच्या संख्येच्या तुलनेत तिप्पट आहे. त्यामुळे महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात अव्वल क्रमांकावर आहे. India has the largest number of women pilots in the world
गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, भारतात किमान १५ टक्के पायलट महिला आहेत, जे जागतिक स्तरावरील पाच टक्क्यांच्या तिप्पट आहेत. अहवालानुसार, ६७ प्रवासी वैमानिक देखील देशातील विविध विमान कंपन्यांमध्ये काम करत आहेत. भारतात नियोजित विविध एअरलाइन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये एकूण २४४ वैमानिकांची भरती करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, पुढील पाच वर्षांत देशाला प्रतिवर्षी १ हजार वैमानिकांची गरज भासणार आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) नुसार, भारतात सुमारे १० हजार वैमानिक आहेत, ज्यात ६७ परदेशी नागरिक आहेत, जे विविध देशांतर्गत उड्डाणांवर काम करतात. DGCA मान्यताप्राप्त ३५ उड्डाण प्रशिक्षण संस्था ५३ ठिकाणी कार्यरत आहेत.
१९८९ मध्ये, निवेदिता भसीन जगातील सर्वात तरुण व्यावसायिक एअरलाइन कॅप्टन बनल्या. भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमानांसाठी १९९० च्या दशकात महिला वैमानिकांची भरती सुरू केली.
एअर इंडियाच्या ४० टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला –
एअर इंडियाच्या ४० टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला आहेत, असे एअरलाइन्सने निवेदनात म्हटले आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, जगात सर्वाधिक व्यावसायिक महिला पायलट भारतात आहेत. ते म्हणाले, “एअर इंडियामध्ये आमच्यासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकतात हा संदेश दिल्याबद्दल आम्ही त्या प्रत्येकाचे आभार मानतो.” याशिवाय एअर इंडियाच्या एका निवेदना म्हटले आहे की, “अनेक महिला अर्थ, व्यावसायिक, मनुष्यबळ विकास, उड्डाण प्रशिक्षण, फ्लाइट डिस्पॅच, अभियांत्रिकी, सुरक्षा आणि ऑपरेशन्स नियंत्रण यासह विविध विभागांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
India has the largest number of women pilots in the world
महत्वाच्या बातम्या
- महागाई डायन बेडरूममध्ये…, युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास यांची स्मृती इराणींवर अश्लाघ्य शब्दांत टीका
- उत्तरप्रदेश : मानव-पक्षी मैत्रीचा विचित्र शेवट; जखमी अवस्थेतील ‘सारस’ घरी आणून १३ महिने जीव लावला अन्
- राहुलजींकडून सावरकरांचा अपमान; ठाकरेंनी कान टोचले, भाजप – शिवसेनेने सुनावले, तर भुजबळांनी पण डिवचले!!; ठाकरे – काँग्रेस काय करणार??
- पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांना अटक