२०२४ पर्यंत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होता
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Economy भारत अधिकृतपणे जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून मिळालेल्या माहितीचा हवाला देऊन NITI आयोगाचे CEO बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी, २५ मे रोजी हे सांगितले.Economy
सुब्रमण्यम म्हणाले, “फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारतापेक्षा पुढे आहेत आणि जर आपण बनवलेल्या योजना आणि कल्पनांवर टिकून राहिलो तर आपण अडीच ते तीन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू.”
आयएमएफच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की भारत लवकरच जर्मनीला मागे टाकून अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत (जीडीपीची तुलना करून) जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनेल.
एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या IMF च्या नवीनतम जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ साठी भारताचा नाममात्र GDP सुमारे ४,१८७.०१७ अब्ज यूएस डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हे जपानच्या संभाव्य GDP पेक्षा किंचित जास्त आहे, जे अंदाजे ४,१८६.४३१ अब्ज यूएस डॉलर आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०२४ पर्यंत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होता. पण आता भारत अधिकृतपणे चौथ्या क्रमांकावर आला आहे.