नाशिक : “ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारताने पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारल्यानंतर तसेच 7 लष्करी आणि हवाई तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानची भाषा थोडी बदलली. आम्हाला युद्ध नको, असे ते म्हणायला लागले, पण या पार्श्वभूमीवर भारताने एक अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक बदलाचा निर्णय जाहीर केला, तो म्हणजे भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकेल!!
“ऑपरेशन सिंदूरच्या” पार्श्वभूमीवर भारताचा हा निर्णय सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आत्तापर्यंत भारताने “दहशतवाद” (terrorism) आणि “युद्ध” (war) या दोन्ही संकल्पना भिन्न मानल्या होत्या. दहशतवाद हा “दहशतवाद” असतो, ते “युद्ध” नसते असे मानले जात होते. त्यामुळे राजनैतिक पातळीपासून ते प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानापर्यंत दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवादी धर्म विचारून कृत्य करत नाहीत, त्यांनी “तसे” केले, तरी ते “तसे” मानायचे नसते, वगैरे बाता मारल्या जात होत्या. दहशतवाद, दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे हे वेगवेगळे मानले जात होते.
पण या सगळ्यामुळे पाकिस्तानला आपणच “दहशतवादाचे बळी” ठरल्याचे बोंब मारायची मुभा मिळत होती. प्रत्यक्षात पाकिस्तानच दहशतवादाला पोसत राहायचा, पण पाकिस्तानी राज्य (Pakistani state) निराळे, राज्यकर्ते (Pakistani rulers) निराळे आणि दहशतवादी (terrorists) निराळे असे भासवत राहायचा. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला देखील ते मान्य करावे लागायचे. त्यामुळे भारताचे आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच पातळीवर दहशतवादाशी मुकाबला करत आहेत, असे चित्र निर्माण करण्यात पाकिस्तान यशस्वी व्हायचा.
पण प्रत्यक्षात “पाकिस्तान” आणि “दहशतवाद” हे भिन्न कधीच नव्हते. उलट पाकिस्तानी सैनिकच दहशतवाद्यांच्या वेशात भारतात घुसखोरी करून हल्ले करायचे. सर्वसामान्य माणसांचे बळी घ्यायचे, पण पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी हे भिन्न मानले गेल्याने पाकिस्तानी सैनिक नामानिराळे राहायचे.
– पहलगाम हल्ल्यात 4 पाकिस्तानी कमांडोज
पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये 4 पाकिस्तानी कमांडोज दहशतवाद्यांच्या वेशात आले होते. त्यांनी पर्यटकांना धर्म विचारूनच गोळ्या घातल्या. पण पाकिस्तानने इथेही हात झटकायचा प्रयत्न केला. दहशतवादी “वेगळे” आणि पाकिस्तानी राज्य आणि सैनिक “वेगळे” हे जगासमोर दाखवायचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात भारताच्या तपासामध्ये पाकिस्तानी सैनिकच दहशतवादी म्हणून आल्याचे सत्य समोर आले. फक्त पाकिस्तानी सैनिकांना उपलब्ध असणारे चीनच्या हुवेई कंपनीचे मोबाईल त्यांच्याकडे आढळले. पहलगाम मधून ते पाकिस्तानात आणि चीनमध्ये बोलत असल्याचे उघड झाले.
– युद्धाच्याच भाषेत प्रत्युत्तर
त्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी आणि पाकिस्तान राज्य आणि सैनिक यांच्यातली आधीच पुसलेली सीमारेषा आता भारताने सगळ्या जगासमोर आणली. इथून पुढे भारतात कुठलीही दहशतवादी कारवाई झाली, तर त्याला केवळ “दहशतवादी” हे “लेबल” लावून त्याचा मुकाबला होणार नाही, तर ते भारताविरुद्ध युद्धच पुकारले आहे, असे समजूनच त्याला ठोकले जाईल, अशा धोरणात्मक बदलाचा निर्णय भारताने घेतला आहे. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा, की इथून पुढे भारतीय सैन्य दले भारतातल्या कुठल्याही दहशतवादी कृत्याचे दणकट प्रत्युत्तर पाकिस्तानात घुसूनच देतील. त्यात दहशतवादी (terrorists) आणि पाकिस्तानी सैन्य (Pakistani forces) किंवा पाकिस्तान राज्य (Pakistani state) असा कुठलाही भेदभाव ठेवणार नाहीत. act of war ला भारत संपूर्ण युद्धाच्या भाषेतच उत्तर उत्तर देईल!!
India has decided that any future act of terror will be considered an Act of War against India and will be responded accordingly
महत्वाच्या बातम्या
- Colonel Sophia कर्नल सोफिया म्हणाल्या- पाकिस्तान नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतोय; 400 ड्रोन उडवले
- BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय
- Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!
- Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील