विशेष प्रतिनिधी
दिल्ली : “भारत नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील” असे खळबळजनक विधान केले आहे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलीमीन पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी. सोमवारी ते एका जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे.
“India has always been, is and will remain a Hindu vote bank”; Asaduddin Owaisi
पुढे ते म्हणतात, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम लढली नाही तरी भाजप कशी काय जिंकली? 2017 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. एमआयएम फक्त 25 ते 27 जागांवर निवडणूक लढवत होता. पण भाजप 300 जागांवर निवडून आली. याला कोण जबाबदार आहे? 2019 सालची लोकसभा निवडणूकही झाली, तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम लढली नाही. सपा आणि बसपा एकत्र लढले. केवळ 25 जागांवर यश मिळवता आले. मग सांगा त्या सगळ्या जागांवर भाजप कशी काय जिंकली?
Hindu – Muslim DNA; द्ग्विजयसिंगांनी उकरून काढला धर्मांतरविरोधी, लव जिहादविरोधी कायद्याचा मुद्दा
मुस्लीम बांधवांना संबोधित करत ओवेसी म्हणतात की, आपल्या डोळ्यांमध्ये ही धूळफेक करण्यात आली होती की मुस्लीम समाज हा व्होट बँक आहे. मी संसदेत उभा राहून ही गोष्ट सांगितली होती की भारतात मुस्लिम व्होट बँक राहणार नाही. भारत नेहमीच हिंदू व्होट बँक आहे आणि राहील. असे यावेळी मुस्लीम ओवेसी यांनी बोलून दाखवले आहे.
आपली खंत व्यक्त करताना ते म्हणतात की, दरवेळी मुस्लिम व्होट मुस्लिम व्होट असा त्रागा केला जातो. पण संसदेमध्ये फक्त 23 ते 24 खासदार का निवडून येतात? देशात कधीच मुस्लिम व्होट बँक नव्हती असे त्यांनी या वेळी ठासून सांगितले आहे.
“India has always been, is and will remain a Hindu vote bank”; Asaduddin Owaisi
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान