UNESCO World Heritage List : भारतातील 39 व्या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतामधील रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यात असलेल्या पालमपेठमधील हे मंदिर रामाप्पा मंदिर या नावानेही ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. India gets its 39th World Heritage Site Rudreswara Temple at Telangana inscribed on UNESCO World Heritage List
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातील 39 व्या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतामधील रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यात असलेल्या पालमपेठमधील हे मंदिर रामाप्पा मंदिर या नावानेही ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.
रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारे एक विशेष अद्भुत आहे. मंदिराच्या वास्तुविशारदाच्या नावावरून ते रामाप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी वर्ष 2019 मध्ये भारत सरकारतर्फे या एकमेव स्थळाचा नामनिर्देश केला गेला होता.
“जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकताच भारतातील तेलंगणाच्या काकतीया रुद्रेश्वर म्हणजेच रामाप्पा मंदिराचा समावेश. ब्राव्हो!!” असे ट्विट करत युनेस्कोने ही घोषणा केली.
तेलंगणा राज्यातील वारंगळजवळील मालुगू जिल्ह्यातल्या पालमपेठ येथील रामप्पा मंदिर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रुद्रेश्वर मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून संयुक्त राष्ट्र शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था म्हणजेच युनेस्कोने मान्यता दिली, यासंदर्भात मार्गदर्शन तसेच सहकार्य दिल्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि इशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आले आहेत.
रेड्डी यांनी भारतीय सर्वेक्षण विभाग तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचेही आभार मानले आहेत.
India gets its 39th World Heritage Site Rudreswara Temple at Telangana inscribed on UNESCO World Heritage List
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची भाजपच्या गोविंद केंद्रेंना जबर मारहाण, मंत्री भुमरेंच्या कार्यालयात घडला प्रकार
- सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुंबईतल्या तरुणाने टाकला रेल्वेखाली आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांनी केली अटक
- मोठी बातमी : मीराबाईचे मेडल गोल्डमध्ये बदलण्याची शक्यता, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या चिनी खेळाडूवर डोपिंगचा संशय, चाचणी होणार
- माजी इस्रो शास्त्रज्ञांच्या फसवणूकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने म्हटले – सीबीआयने एफआयआर नोंदवला, आदेशाची गरज नाही
- Karnataka CM : येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकचा कारभारी कोण? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही 3 नावे