India GDP : भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची मोठी आकडेवारी समोर आली आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान, जीडीपीच्या आघाडीवर पहिल्यांदाच केंद्र सरकारसाठी चांगली बातमी आली आहे. India GDP data release fiscal deficit and economy growth and FY22 target Records 20 percent Growth
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची मोठी आकडेवारी समोर आली आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान, जीडीपीच्या आघाडीवर पहिल्यांदाच केंद्र सरकारसाठी चांगली बातमी आली आहे.
GDP ची उंच उसळी
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी निकाल जाहीर केला आहे. पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) विकास दर विक्रमी 20.1 टक्के आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर नकारात्मक 23.9 टक्के होता. जीडीपी हे कोणत्याही देशाचे आर्थिक आरोग्य मोजण्यासाठी सर्वात अचूक परिमाण आहे.
आरबीआयच्या अंदाजापेक्षा किंचित कमी
याआधी, एसबीआयच्या इकोरॅप रिसर्च अहवालात अंदाज होता की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी 18.5 टक्के दराने वाढू शकतो. त्याच वेळी आरबीआयने एप्रिल-जून 2021 तिमाहीत 21.4 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज लावला होता. जीडीपीमध्ये तीव्र सुधारणा झाल्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे आहेत.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का
विशेष म्हणजे कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्के मोठी घट झाली. त्यानंतर, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 7.5 टक्क्यांनी घटली, तर तिसऱ्या तिमाहीत ती 0.4%होती. तर चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च), जीडीपी वाढीचा दर 1.6 टक्के नोंदवला गेला. अशा प्रकारे, आर्थिक वर्ष 2020-21 साठी जीडीपी वाढीचा दर -7.3% टक्के होता.
जीडीपी म्हणजे काय?
सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशाच्या हद्दीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक किंवा बाजार मूल्य. हे देशाच्या देशांतर्गत उत्पादनाचे सर्वसमावेशक मापन आहे आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य दर्शवते. त्याची गणना साधारणपणे दरवर्षी केली जाते, परंतु भारतात दर तीन महिन्यांनी म्हणजेच तिमाहीने गणना केली जाते. काही वर्षांपूर्वी शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि संगणक अशा विविध सेवादेखील सेवा क्षेत्रात जोडल्या गेल्या.
India GDP data release fiscal deficit and economy growth and FY22 target GDP Records 20 percent Growth
महत्त्वाच्या बातम्या
- Tokyo Paralympics : मरिअप्पन थंगावेलू आणि शरद कुमार यांचा दुहेरी धमाका, भारताच्या खात्यात रौप्य आणि कांस्यपदक
- अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीमुळे जम्मू काश्मिरातही वाढली चिंता, 60 तरुण बेपत्ता झाल्याने सुरक्षा दले सतर्क
- Maharashtra Heavy Rain : मुंबईसह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस, चाळीसगाव परिसरात पाणीच पाणी, कन्नड घाटात दरड कोसळली
- Afghanistan Crisis : भारतीय हवाई दलाचीही अफगाणिस्तानातील मोहीम संपली! सर्व विमाने ताजिकिस्तानहून परतली
- अमेरिकी सैन्याच्या पूर्ण माघारीनंतर तालिबान्यांनी केला जल्लोष, काबूलमधली शाळकरी चिमुरडी म्हणते, भीती वाटत नाही!