अफगाणिस्थानच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या दहशतवादी तालिबानी गटांशी भारत सरकारने पहिल्यांदाच संवादाची कवाडे खुली केली आहेत. भारताच्या या आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे शेजारी पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भारताच्या वतीने पहिल्यांदाच हे धूर्त पाऊल उचलले आहे. India first time opened channels of communication with Afghan Taliban; The Indian outreach is largely led by security officials and limited to Taliban factions and leaders
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परराष्ट्र धोरणांमध्ये मोठा बदल करत भारत सरकारने अफगाण तालिबानी गट आणि नेत्यांसोबत संवादाचा मार्ग खुला करण्याची तयारी दाखवली आहे. पाकिस्तान आणि इराण या देशांच्या तालावर न नाचणाऱ्या तालिबानी गट आणि नेत्यांपुरताच हा संवाद मर्यादीत राहणार आहे.
विशेष म्हणजे हे अफगाणी तालीबानी “राष्ट्रवादी” विचारांचे म्हणून ओळखले जातात. भारत सरकारच्या या पवित्र्यामुळे अमेरिकी गुप्तचर यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
भारत सरकारने पहिल्यांदाच असे पाऊल उचलले आहे. मुल्लाह बरदार याच्यासह काही ठरावीक अफगाण तालिबान्यांशी संवाद साधला जाणार आहे. अफगाणीस्थानातून अमेरिकी सैन्याने मोठ्या प्रमाणात काढता पाय घेतला आहे. यानंतर अफगाणी जनतेला विकास हवा आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पहिल्यांदाच उचललेले पाऊल धोरणी मानले जात आहे.
अफगाण तालिबान्यांशी कोणत्याही प्रकारे संवाद न साधण्याची नवी दिल्लीची आजवरीच भूमिका राहिली आहे. त्याला छेद देण्याची वेळ आली असून हा बदल आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणीस्थान बदलतो आहे. तेथील नव्या व्यवस्थेत राष्ट्रवादी तालिबानींना स्थान असणार आहे.
अशावेळी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे मानले जात आहे. वरीष्ठ भारतीय सुरक्षा अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांचा प्रभाव नसलेल्या तालिबानी गटांचा आणि नेत्यांचा शोध गेल्या अनेक महिन्यांपासून घेतला जात होता. त्यानंतरच संवादाची कवाडे खुली करण्याचा निर्णय झाला.
मुल्ला बरदार हा अफगाण तालिबानचा सहसंस्थापक मानला जातो. मोठ्या तालिबान गटावर त्याचा प्रभाव आहे. मुख्य वाटाघाटी करणारा म्हणून बरदारची ओळख आहे. मुल्ला बरदार आणि भारत या दोन्ही बाजूंनी संदेशांची देवाणघेवाण झाली.
अन्य तालिबानी गटांसीही चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दक्षिण पाकिस्तानातील बलुचीस्थान आणि वायव्य पाकिस्तानातील पठाण पाकिस्तानी सरकारच्या अन्यायकारक वागणुकीबद्दल नाराज आहेत. अफगाणी तालिबान्यांशी त्यांचे संबंध आहेत. त्यातच भारतानेही अफगाणी राष्ट्रवादी तालिबान्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने पाकिस्तानचा जळफळाट सुरु झाला आहे.
India first time opened channels of communication with Afghan Taliban; The Indian outreach is largely led by security officials and limited to Taliban factions and leaders
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यांनी घातलेल्या गोंधळानंतर मोदींनी नोंदवली 44 कोटी लसींची मागणी
- दहा चपात्या, डाळ-भाताने भागेना पहिलवान सुशील कुमारची भूक
- खासगी रुग्णालयांतील लशींचे दर निश्चित; कोव्हिशिल्ड 780 तर कोव्हॅक्सिन 1410 रुपयांना
- PM WITH CM : परत सत्तांतर होणार ; मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींशी भेट म्हणजे राजकीय तडजोडच उदयनराजे भोसले