• Download App
    India economic strike पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानला दीर्घकालीन फटका द्यायचा पाया रचला.

    भारताचा पाकिस्तानवर आता economic strike; पाकिस्तान मधून होणारी सर्व आयात एका झटक्यात बंद!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानला दीर्घकालीन फटका द्यायचा पाया रचला. आता त्या पुढे जाऊन भारताने पाकिस्तानवर economic strike करून पाकिस्तानामधून होणारी सर्व आयात एकाच झटक्यात बंद करून टाकली.

    पाकिस्तान मध्ये निर्मिती होणाऱ्या आणि पाकिस्तान मार्फत भारतात निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर भारताने बंदी घातली. ही बंदी तातडीने लागू केली. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी व्हायला सुरुवात झाली. पाकिस्तान मधून भारतात सिमेंट, टेक्स्टाईल आणि काही कृषी उत्पादने आयात होतात परंतु हा व्यापार फारच थोडा आहे, तरी देखील पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतली जान कायम राहण्यासाठी तो व्यापार पाकिस्तानला आवश्यक होता.

    शिवाय या व्यापाराच्या आडून पाकिस्तानला काही अवैध गोष्टी देखील भारतात पाठविणे शक्य होत होते. आता भारताने ही आयात संपूर्ण बंद केल्याने पाकिस्तान मधले सिमेंट उत्पादन टेक्स्टाईल आणि कृषी उत्पादन या क्षेत्रांना धक्का बसणार असून व्यापारा मार्फत होणाऱ्या अवैध गोष्टी देखील थांबणार आहेत.

    त्याचबरोबर पाकिस्तानला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बँकांना भारताने विशिष्ट सूचना केल्या असून त्यांनी पाकिस्तानला होणारे फंडिंग थांबवावे यासाठी भारताने या बँकांवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय फंडिंगच्या काळ्या यादीत लवकरच पाकिस्तानचा समावेश होण्याची शक्यता आहे.

    India economic strike on Pakistan now

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Red Fort Bomb Blast : दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोटप्रकरणी 7500 पानांचे आरोपपत्र सादर; 10 आरोपींवर दहशतवादी नेटवर्क चालवल्याचा आरोप, 8 दहशतवाद्यांपैकी 5 डॉक्टर

    Sabarimala : शबरीमला प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित;16 दिवस चालली सुनावणी; न्यायालयाने केंद्र, धार्मिक संघटना आणि याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकले

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्न; समितीमध्ये विरोधी पक्षनेत्याला ठेवण्याचा दिखावा कशाला?