• Download App
    India economic strike पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानला दीर्घकालीन फटका द्यायचा पाया रचला.

    भारताचा पाकिस्तानवर आता economic strike; पाकिस्तान मधून होणारी सर्व आयात एका झटक्यात बंद!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानला दीर्घकालीन फटका द्यायचा पाया रचला. आता त्या पुढे जाऊन भारताने पाकिस्तानवर economic strike करून पाकिस्तानामधून होणारी सर्व आयात एकाच झटक्यात बंद करून टाकली.

    पाकिस्तान मध्ये निर्मिती होणाऱ्या आणि पाकिस्तान मार्फत भारतात निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर भारताने बंदी घातली. ही बंदी तातडीने लागू केली. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी व्हायला सुरुवात झाली. पाकिस्तान मधून भारतात सिमेंट, टेक्स्टाईल आणि काही कृषी उत्पादने आयात होतात परंतु हा व्यापार फारच थोडा आहे, तरी देखील पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतली जान कायम राहण्यासाठी तो व्यापार पाकिस्तानला आवश्यक होता.

    शिवाय या व्यापाराच्या आडून पाकिस्तानला काही अवैध गोष्टी देखील भारतात पाठविणे शक्य होत होते. आता भारताने ही आयात संपूर्ण बंद केल्याने पाकिस्तान मधले सिमेंट उत्पादन टेक्स्टाईल आणि कृषी उत्पादन या क्षेत्रांना धक्का बसणार असून व्यापारा मार्फत होणाऱ्या अवैध गोष्टी देखील थांबणार आहेत.

    त्याचबरोबर पाकिस्तानला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बँकांना भारताने विशिष्ट सूचना केल्या असून त्यांनी पाकिस्तानला होणारे फंडिंग थांबवावे यासाठी भारताने या बँकांवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय फंडिंगच्या काळ्या यादीत लवकरच पाकिस्तानचा समावेश होण्याची शक्यता आहे.

    India economic strike on Pakistan now

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथील राम मंदिरात नमाज पठणाचा प्रयत्न, कॅम्पसमध्ये घुसलेल्या 2 तरुण आणि एका तरुणीला पकडले

    Ajit Doval : अजित डोभाल म्हणाले- युद्ध शत्रूचे मनोधैर्य खच्चीकरणासाठी लढले जाते, सध्याच्या नेतृत्वाने 10 वर्षांत देश बदलला

    mohan bhagwat : हिंदू समाज शौर्याने नाही तर फुटीमुळे हरला, सरसंघचालक म्हणाले- हिंदूंनी एकत्र आले पाहिजे, आपण एक झालो की त्यांचे तुकडे होतील