वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारत आता विकसित होण्याच्या अशा वळणावर उभा आहे की जागतिक राजकारणात भारताची भूमिका संकुचित राहिलेली नाही तर ती अधिक सखोल व्यापक आणि उच्चतम अपेक्षित आहे असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याआधी वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. India deserves much higher, deeper, wider profile, role: Modi
या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी भारत अमेरिका संबंध त्याचे दोन्ही देशांवर होणारे परिणाम तसेच जागतिक भू राजनैतिक आयाम या सर्व मुद्द्यांवर सविस्तर उत्तरे दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
- वाढत्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी युनायटेड नेशन्स (UN) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना बदल घडवून आणावे लागतील.
- भारत सध्या विकासाच्या अशा टप्प्यावर उभा आहे की जिथे जागतिक राजकारणात भारताची भूमिका अधिक सखोल व्यापक आणि उच्चतम प्रोफाइलला पात्र आहे. किंबहुना भारताचा तो अधिकार आहे.
- जागतिक हवामान बदलाच्या परिणामांपासून पृथ्वीच्या बचावासाठी श्रीमंत राष्ट्रांचे आणि त्यांच्या प्राधान्यक्रमांचे अधिक व्यापकपणे प्रतिनिधी बनवण्यासाठी बदल आवश्यक आहेत.
- जागतिक पातळीवर आज छोटे आणि प्रादेशिक गट निर्माण झाले आहेत. त्यांच्या आशा आकांक्षा फुलत आहेत त्याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे संयुक्त राष्ट्रसंघासारख्या जागतिक संस्थांनी आपली भूमिका व्यापक आणि विस्तारित करून या छोट्या आणि प्रादेशिक गटांकडे लक्ष पुरवले पाहिजे.
- संयुक्त राष्ट्र संघात मुख्य संस्थांचे सदस्यत्व पहा – ते खरोखर लोकशाही मूल्यांचा आवाज दर्शवते का? आफ्रिकेसारख्या ठिकाणाला त्यात आवाज आहे का?
- भारताची लोकसंख्या एवढी प्रचंड आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत ते एक उज्ज्वल स्थान आहे, पण ते सध्या भारताला पुरेसे प्रतिनिधित्व आहे का?? संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत भारताला केव्हाच कायमचे स्थान मिळायला हवे होते पण ते विशिष्ट प्रगत देशांच्या आणि आडमुठ्या भूमिकेमुळे मिळाले नाही.
- जगभरातील शांतता मोहिमांमध्ये भारत अग्रक्रमाने भाग घेतो. सैन्याचे योगदान कुठेही कमी पडू देत नाही.
- अशा स्थितीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या कायमच्या सदस्यत्वाचे सर्वांनी नीट मूल्यमापन केले पाहिजे भारताला तिथे स्थान का हवे आहे??, त्याचा तो हक्क का आहे??, याचा नीट विचार केला पाहिजे.
- स्वतंत्र भारतात जन्मलेला मी पहिला पंतप्रधान आहे आणि म्हणूनच माझी विचार प्रक्रिया, माझे आचरण, मी जे काही बोलतो आणि करतो ते माझ्या देशाच्या गुणधर्म आणि परंपरांनी प्रेरित आणि प्रभावित आहे. त्यातून मी माझी ताकद मिळवतो. मी माझा देश जसा आहे तसा आणि मी जसा आहे तसा मी जगासमोर मांडतो.
- जागतिक पातळीवरील अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारत जागतिक स्तरावर आपले स्थान उंचावतो आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सखोल आहेत. दोन्ही देशांमध्ये “अभूतपूर्व विश्वास” निर्माण झाला आहे.
- संरक्षण सहकार्य व्यापार तंत्रज्ञान ऊर्जा या सर्व क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका भागीदारीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
WSJ ची निरीक्षणे
- भारत प्रगत हलक्या लढाऊ विमानांसाठी भारतात जेट-फायटर इंजिन तयार करण्यासाठी आणि वॉशिंग्टनमध्ये सशस्त्र प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्यासाठी या आठवड्यात अब्जावधी-डॉलरचा करार करणे अपेक्षित आहे.
- पॅसिफिक महासागर आणि चीनच्या सीमेजवळ चीनशी सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमावर्ती भागात शांतता आणि शांतता आवश्यक असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला.
- “सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे, कायद्याचे नियम पाळणे आणि मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण करणे यावर आमचा मूळ विश्वास आहे. त्याच वेळी, भारत आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आणि वचनबद्ध आहे.”
WSJ चे निरीक्षण
- जागतिक पातळीवर चीनच्या विस्तारवादाचा आणि वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांचे मजबूत संबंध याचा भारताला अधिक फायदा होईल. भारत अमेरिका मैत्री चीनला राजनैतिक काटशह देईल.
- भारत रशियन तेलाची सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतानाही त्याने अमेरिकेने संरक्षण संबंध अधिक दृढ केले आहेत आणि रशियाला युक्रेनशी युद्ध पुकारताना आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे.
रशिया आणि युक्रेन युद्ध थांबावे तिथे शांतता निर्माण व्हावी ही भारताची भूमिका आहे आणि ती जगाला समजली आहे. भारत रशिया आणि युक्रेन युद्धात तटस्थ नाही. तो शांततेच्या बाजूने आहे. - रशिया – युक्रेन या दोन्ही देशांमध्ये चर्चेचा पूल बनण्याची भारताची तयारी आहे.
- जागतिक राजकारणातील भारताच्या भूमिकेपासून ते जागतिक अर्थव्यवस्थेतील योगदानापर्यंत भारताचा प्रभाव वाढला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचे परराष्ट्र धोरण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पेक्षा यांच्या अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणापेक्षा निश्चितच वेगळे आणि भारताची जागतिक पातळीवरची भूमिका अधिक ठळक करणारे आहे.
India deserves much higher, deeper, wider profile, role: Modi
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांची पॉप्युलरिटी, भाजपची सलग तिसऱ्यांदा शंभरी, ही तर पवारांची राजकीय कंबख्ती!!
- Maharashtra Drone Mission : देशातील पहिले ड्रोन धोरण आणि इकोसिस्टम महाराष्ट्राने तयार करावे – फडणवीस
- इतरांना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचीच खरी गद्दारी; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान
- तीच कॅसेट वाचवू नका, निदान स्क्रिप्ट रायटर तरी बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला