वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या 3 मंत्र्यांनी आगाऊपणा करत भारताचा आणि पंतप्रधान मोदींचा अपमान करणारी ट्विट केली. हा विषय भारताने अत्यंत गांभीर्यपूर्वक घेऊन परराष्ट्र मंत्रालयाने आज मालदीवच्या राजदूताला आज परराष्ट्र मंत्रालयात बोलवून त्यांची झाडाझडती घेतली. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांच्या चीन दौऱ्यापूर्वी मालदीवच्या उच्चायुक्तांची भारतीय परराष्ट्र मंत्रालयात झाडाझडती झाल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पडसाद उमटून मालदीव सरकारची नाचक्की झाली आहे. India demarches Maldives over crude Male conduct
आज सकाळी, भारतातील मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आणि आता निलंबित केलेल्या 3 कनिष्ठ मंत्र्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल त्यांना परखड बोल सुनावण्यात आले. मालदीवच्या 3 बडतर्फ मंत्र्यांनी केलेली टीकाटिप्पणी आंतरराष्ट्रीय संकेतांना धरून नाही. दोन देशातील संबंधांनाही त्या टिपण्णी चांगल्या नाहीत. भारत अशा टीका बिलकुल सहन करणार नाही, अशा शब्दांत मालदीवच्या राजदूताला परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन सुनावले.
मालदीवची राजधानी माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी देखील कालच रविवारी मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटून भारताची ही परखड भूमिका स्पष्ट शब्दांत सांगितली. मालदीवच्या 3 मंत्र्यांची पंतप्रधान मोदींवरील असभ्य टीकाटिपण्णी भारताला पूर्णपणे अमान्य आहे. भारत ती कधीही स्वीकारणार नाही दोन्ही देशांमधील संबंधांसाठी असा असभ्य टीका टिप्पणी घातक आहे, असे भारतीय उच्चायुक्तांनी मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्ट बजावले.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोईज्जू पुढच्या 5 दिवसांनी चीनला भेट देणार आहेत. तेथे चिनी राज्यकर्त्यांकडे ते मालदीव साठी मोठ्या निधीची मागणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने कठोर भूमिका घेत मालदीवला मालदीव सरकारचे डोके ठिकाणावर आणले आहे.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले होते की, मालदीवच्या सरकारला परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद टिप्पणीची जाणीव आहे. ही मते वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकारचा या विचारांना पाठिंबा नाही.
परंतु, मालदीव परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्यानंतरच केवळ 3 मंत्र्यांना बडतर्फ करणे ही पुरेशी कारवाई नाही, अशी भूमिका घेत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवच्या राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलून त्यांची झाडाझडती घेतली आणि त्यांना भारताची भूमिका परखड शब्दांत सांगितली.
India demarches Maldives over crude Male conduct
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात शेख हसीनांचे सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड!
- INDIA आघाडीत फूट? जागावाटप झालेले नसताना केजरीवालांकडून उमेदवाराची घोषणा
- “जुना भारत” समजून खेळायला गेले कुस्ती; मोदींच्या नव्या भारताने उतरवली मालदीवची मस्ती!!
- टीएमसी नेत्याविरोधात जारी केलेल्या लुकआउट नोटीसीवरून काँग्रेसची खोचक टिप्पणी