भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘प्रलय’ची दुसऱ्यांदा यशस्वी चाचणी करून इतिहास रचला. यासह, भारताच्या इतिहासात प्रथमच, 24 तासांच्या आत दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीपासून जमिनीवर मारा करणारे असून ते 150 ते 500 किमी अंतरावरील लक्ष्य सहज नष्ट करू शकते. सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. India created history For the second day in a row, a record was made by testing the Pralaya ballistic missile, know its Features
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘प्रलय’ची दुसऱ्यांदा यशस्वी चाचणी करून इतिहास रचला. यासह, भारताच्या इतिहासात प्रथमच, 24 तासांच्या आत दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीपासून जमिनीवर मारा करणारे असून ते 150 ते 500 किमी अंतरावरील लक्ष्य सहज नष्ट करू शकते. सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून आज सकाळी अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलयची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्थेने विकसित केलेले घन-इंधन, लढाऊ क्षेपणास्त्र हे भारतीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम ‘पृथ्वी डिफेन्स व्हेइकल’वर आधारित आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पेलोड क्षमता 500-1,000 किलोग्रॅम आहे.
चिनी क्षेपणास्त्राला देणार टक्कर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रावर डीआरडीओने 2015 मध्ये चर्चा केली होती. डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात सांगितले होते की, हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीवरून तसेच कन्सटरमधूनही डागता येते.
संरक्षण मंत्र्यांनी डीआरडीओचे केले अभिनंदन
प्रलय सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट मोटर आणि इतर नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणाली अत्याधुनिक नेव्हिगेशनल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी बसवण्यात आली आहे. या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले होते की, पहिल्या चाचणीसाठी DRDO आणि त्याच्याशी संबंधित टीमचे अभिनंदन. ते म्हणाले, “आधुनिक पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मी तुमचे अभिनंदन करतो, ही आजची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे,” असे ते म्हणाले, तर डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी म्हणाले की, नवीन पिढीचे क्षेपणास्त्र सशस्त्र दलांना अधिक बळ देईल.