• Download App
    भारत बनू शकतो दक्षिण आशियातील भंगाराचे केंद्र, शहरातील केंद्रबिंदूपासून १५० किमी अंतरावर किमान एक स्क्रॅपिंग सेंटर, नितीन गडकरींची माहिती India could become a scrap center in South Asia, at least one scraping center 150 km from the city center, says Nitin Gadkari

    भारत बनू शकतो दक्षिण आशियातील भंगाराचे केंद्र, शहरातील केंद्रबिंदूपासून १५० किमी अंतरावर किमान एक स्क्रॅपिंग सेंटर, नितीन गडकरींची माहिती

    भारत संपूर्ण दक्षिण आशिया भागातील वाहन भंगाराचे केंद्र बनू शकतो. बांगलादेश, भूतान, म्यानमार, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका येथील जुनी वाहने आयात करून भारतात ती भंगारात काढली जाऊ शकतात. केंद्र सरकारने जुनी वाहने रस्त्यावरून हद्दपार करण्यासाठी वाहन भंगार धोरण आणले असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. India could become a scrap center in South Asia, at least one scraping center 150 km from the city center, says Nitin Gadkari


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत संपूर्ण दक्षिण आशिया भागातील वाहन भंगाराचे केंद्र बनू शकतो. बांगलादेश, भूतान, म्यानमार, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका येथील जुनी वाहने आयात करून भारतात ती भंगारात काढली जाऊ शकतात. केंद्र सरकारने जुनी वाहने रस्त्यावरून हद्दपार करण्यासाठी वाहन भंगार धोरण आणले असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

    भारताला दक्षिण आशियातील वाहन भंगाराचे केंद्र बनविण्याची योजना असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, भंगार केंद्रांची उभारणी महत्त्वाची असल्याचे ओळखून प्रत्येक शहराच्या १५० किलोमीटर परिक्षेत्रात किमान एक भंगार वाहन केंद्र विकसित करण्याची योजना आहे. वाहन भंगार धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.



    प्रदूषण करणारी आणि असुरक्षित असलेली जुनी वाहने हद्दपार करायची आहेत. त्यासाठी शहरांच्या केंद्रापासून १५० किलोमीटर परिक्षेत्रात एक भंगार केंद्र उभारण्याचा हेतू आहे. तसेच एका शहरामध्ये भंगारात टाकण्यात येणाºया वाहनांचे संकलन करण्यासाठी अनेक केंद्र उघडता येऊ शकतात. त्यांना वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार असेल.

    India could become a scrap center in South Asia, at least one scraping center 150 km from the city center, says Nitin Gadkari

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??